ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार मदत द्या;शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस आक्रमक, तहसील कार्यालयासमोर निदर्शने
0
7
6
4
8
6
तुळजापूर : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले असून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या, अशा मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले.

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तर फळबागांना एक लाख रुपये मदत मिळालीच पाहिजे. कापणी प्रयोग रद्द करून सरसकट पीक विमा मंजूर करावा. ऑगस्ट-सप्टेंबरमधील उडीद व कांदा लागवडीसाठी एकत्रित मदत द्यावी. उसावरील १५ रुपयांची कपात रद्द करून एपीएल शेतकऱ्यांनाही धान्य द्यावे,” अशी मागणी काँग्रेस पार्टीच्या वतीने केली आहे.

प्रभाग ५ मधील गोरगरिबांच्या गळ्यातले ताईत समजले जाणारे नेते अमोल कुतवळ यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले,देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना मदत जाहीर करतात, पण अटींच्या जाचक अडथळ्यांमुळे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. शेतकऱ्यांना फसवण्याचे काम या सरकारकडून सुरू आहे.नियत चांगली नसल्याचे हे सिद्ध होते.
तहसीलदार यांना निवेदन देऊन काँग्रेस नेत्यांनी सरकारला “शेतकऱ्यांना आधार द्या अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू” असा इशारा दिला.
यावेळी रणजीत इंगळे, आनंद जगताप, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष मधुकर शेळके, तानाजी चव्हाण, बालाजी बंडगर, हरीश जाधव, श्रीनाप्पा गुंजोटे, हनमंत मते, राजाराम जाधव, रामराव पाटील, प्रफुल्लकुमार शेटे, प्रदीप देशमुख, विकास पाटील, राजाभाऊ शेंडगे, दिलीप भोकरे, किरण यादव, नागनाथ भांजी, श्रीकांत धुमाळ, सुदर्शन वाघमारे आदी नेते उपस्थित होते.

ॲड.धीरज पाटील म्हणाले, “शेतमालाला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी कायम अडचणीत आहे. आता अतिवृष्टीने तर त्याचे सर्वस्वच हातातून गेले आहे. अशा वेळी सरकारने ठोस पावले उचलली नाहीत, तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल.”
0
7
6
4
8
6



