Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर नगराध्यक्षपद खुलं; विनोद गंगणे यांच्या नावाने सोशल मीडियावर ‘सुनामी’!

“तुळजापूरच्या राजकारणातील कोहिनुर हिरा विनोद गंगणे पुन्हा एकदा केंद्रस्थानी!”

0 7 6 5 0 6

तुळजापूर नगराध्यक्षपद खुलं; विनोद गंगणे यांच्या नावाने सोशल मीडियावर ‘सुनामी’!

“तुळजापूरच्या राजकारणातील कोहिनुर हिरा विनोद गंगणे पुन्हा एकदा केंद्रस्थानी!”

“जनतेच्या मनावर अधिराज्य- विनोद गंगणेचं नाव अग्रस्थानी!”

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत तुळजापूर नगराध्यक्षपद ‘सर्वसाधारण पुरुष’ प्रवर्गासाठी खुलं झालं आहे. या घोषणेनंतर तुळजापूरच्या राजकारणात अक्षरशः भूकंप झाला असून, शहरात नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
या शर्यतीत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली नावं म्हणजे-
भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निकटवर्तीय व लोकप्रिय माजी नगरसेवक विनोद उर्फ पिटू गंगणे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे.
◾“तुळजापूरच्या राजकारणातील कोहिनूर हिरा!”
गेल्या १० ते १५ वर्षांपासून तुळजापूर शहरात सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत गंगणे बंधूंनी केलेलं कार्य उल्लेखनीय आहे. कोरोना काळात प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा ‘मदतीचा हात’ म्हणून विनोद उर्फ पिटू गंगणे यांची ओळख निर्माण झाली. कोणतेही संकट असो-ते स्वतःच्या घरचं समजून नागरिकांसाठी अहोरात्र झटत असतात.
◾महिलांसाठी,तरुणांसाठी आणि सर्वांसाठी जवळचा नेता
हळदीकुंकू समारंभ,दिवाळीत फराळ वाटप, देवदर्शन व्यवस्थापन,सामाजिक उपक्रम अशा विविध क्षेत्रांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळेच आज तुळजापूरमध्ये विरोधक बोटावर मोजतील इतकेच राहिले असून,जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आवाज म्हणजे विनोद गंगणे आणि विजय गंगणे!
◾सोशल मीडियावर “विनोद गंगणे वादळ”
आरक्षण खुलं झाल्यापासूनच फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवर गंगणे बंधूंच्या नावाची चर्चा थंडावण्याचं नाव घेत नाही. समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव,पोस्ट्सचा पाऊस आणि प्रचाराची जोरदार लाट सुरू झाली आहे. “नगराध्यक्षपदावर विनोद गंगणे नावाची मोहर बसलीच पाहिजे!”
असं समर्थकांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे.राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल, समर्थकांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झाले आहे.
4.6/5 - (5 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे