Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूरमध्ये गुटखा माफियांचा सुळसुळाट; ३० मार्चला अन्न-औषध प्रशासन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

तुळजापूरमध्ये गुटखा माफियांचा सुळसुळाट; ३० मार्चला अन्न-औषध प्रशासन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

0 7 6 4 9 7

तुळजापूरमध्ये गुटखा माफियांचा सुळसुळाट; ३० मार्चला अन्न-औषध प्रशासन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

धाराशिव : तुळजापूर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैध आयात व विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप करत यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी येत्या ३० मार्च २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासन कार्यालय, धाराशिव येथे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.यासंदर्भात समितीच्या वतीने सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, तुळजापूर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात कर्नाटक राज्यातून गुटख्याची अवैध आयात केली जात असून ग्रामीण व शहरी भागात मोठमोठी गोदामे उभारून त्या ठिकाणांहून होलसेल पद्धतीने गुटख्याची विक्री केली जात आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही प्रत्यक्षात मात्र ही बंदी केवळ कागदोपत्रीच राहिल्याचे चित्र दिसून येत असल्याचा आरोप समितीने केला आहे.तुळजापूर शहरासह ग्रामीण भागात खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याने युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर चिंता आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. गुटखा सेवनामुळे कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत असतानाही प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात यापूर्वीही अनेक वेळा आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही ठोस कारवाई झालेली नसल्याने काही अधिकाऱ्यांचे गुटखा माफियांशी आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय निर्माण होत असल्याचा आरोप समितीने केला आहे.तुळजापूर तालुक्यात संपूर्णपणे गुटखा विक्री बंद करून संबंधित माफियांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा ३० मार्च रोजी होणारे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे.या निवेदनावर समितीचे पदाधिकारी गणेश प्रभाकरराव पाटील यांच्या स्वाक्षरी असून आंदोलनाबाबतची माहिती जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच तुळजापूर पोलिस ठाण्यालाही देण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे