ब्रेकिंगमहाराष्ट्र
भाजपने लोकांची उघड फसवणूक केली; दोन कोटी रोजगार कुठे गेले ? – हर्षवर्धन सपकाळांचा तुळजापुरात घणाघात
तुळजापुरात ‘भाजप हटाओ, लोकशाही बचाओ’चा नारा बुलंद

0
7
6
5
0
6
कांद्याला भाव नाही, रस्ते खड्ड्यांत; विकास फक्त भाषणात
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
देशातील तरुणांना फसवी स्वप्ने दाखवून भाजपने लोकांची उघड फसवणूक केली आहे. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा वर्षांनंतरही उत्तर देऊ शकलेले नाहीत. मग हे २४ कोटी रोजगार कुठे गेले? असा थेट सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे जिल्हा परिषद गटाच्या प्रचार सभेत बोलताना सपकाळ म्हणाले, भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देऊन राजकारणाची पातळी घसरवली आहे. महायुती म्हणजे गुन्हेगारांना प्रतिष्ठा देणारी युती असल्याची टीकाही त्यांनी केली.भाजप भावनांचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, खोटी देशभक्ती विकून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोठ्या उद्योगपतींसाठी सरकार चालवले जात असताना सामान्य शेतकरी मात्र उद्ध्वस्त झाला आहे. कांद्याला भाव नाही, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे आणि तरीही सत्ताधारी विकासाच्या गप्पा मारत आहेत.ही निवडणूक सरकारला धडा शिकवण्याची आहे,असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनीही सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करत घराणेशाही व गुन्हेगारी संस्कृतीला पाठीशी घालणाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन केले. सभेला काँग्रेस व महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेच्या शेवटी विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. “भाजप हटाओ, लोकशाही बचाओ”चा नारा देत तुळजापुरात काँग्रेसने प्रचाराचा रणसंग्राम अधिक तीव्र केला आहे.यावेळी व्यासपीठावर काटगाव जिल्हा परिषद गटामध्ये प्रचारासाठी काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, डॉ स्मिता शहापूरकर, तालुकाध्यक्ष रामचंद्र अलुरे, अमर खानापुरे, नगरसेवक अमोल कुतवळ, बालाजी बंडगर ,दत्ता शिंदे, उमेदवार सुनील रोकडे,विजय डोंगरे, कोकरे , झोंबाडे माळी ताई,शिंदे ताई व्यासपीठावर उपस्थित होते.लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसला मतदान करा असे आवाहन केले
0
7
6
5
0
6



