ब्रेकिंगमहाराष्ट्र
कर्तव्यावर असतानाच प्राणज्योत मालवली प्रजासत्ताक दिनी झेंडा वंदन करताना अबकारी दुय्यम निरीक्षक मोहन जाधव यांचे निधन

0
7
6
4
8
6
कर्तव्यावर असतानाच प्राणज्योत मालवली प्रजासत्ताक दिनी झेंडा वंदन करताना अबकारी दुय्यम निरीक्षक मोहन जाधव यांचे निधन
धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तलमोड येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हृदयद्रावक घटना घडली. सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेले दुय्यम निरीक्षक मोहन भिमा जाधव (रा. सोलापूर) यांचा झेंडा वंदन करताना अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.26 जानेवारी रोजी सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त तलमोड सीमा तपासणी नाक्यावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमात सहभागी असलेले दारूबंदी व अबकारी विभागाचे अधिकारी मोहन जाधव हे झेंडा वंदन करत असताना अचानक अस्वस्थ झाले आणि क्षणार्धात कोसळले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना मदतीचा प्रयत्न केला; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.कर्तव्य बजावत असतानाच अधिकाऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.कर्तव्यनिष्ठ व शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मोहन जाधव यांच्या अकाली निधनाने अबकारी विभागासह जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्व स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
0
7
6
4
8
6



