ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
स्वर्गीय लक्ष्मीबाई नरहरी कदम केशव यांच्या स्मरणार्थ भावपूर्ण गोदान सोहळा
कदम बंधूंचा अनोखा उपक्रम

0
6
7
8
4
1
स्वर्गीय लक्ष्मीबाई नरहरी कदम केशव यांच्या स्मरणार्थ भावपूर्ण गोदान सोहळा
तुळजापूर | प्रतिनिधी
स्वर्गीय लक्ष्मीबाई नरहरी कदम केशव यांच्या पुण्यस्मरणार्थ बुधवार, दि. ७ जानेवारी रोजी तुळजापूर येथे पारंपरिक पद्धतीने गोदानाचा धार्मिक व भावपूर्ण कार्यक्रम पार पडला. श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचे दर्शन घडविणारा हा पुण्यकार्यातील सोहळा कुटुंबीयांच्या सहभागातून अत्यंत शांत आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी स्वर्गीय लक्ष्मीबाई नरहरी कदम – केशव यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून करण्यात आली. त्यानंतर मंत्रोच्चार व धार्मिक विधींच्या साक्षीने गोदानाचा विधी पार पाडण्यात आला. श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी श्रीकांत नरहरी कदम व पुजारी प्रवीण नरहरी कदम बंधू यांच्या वतीने त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ हे पुण्यकार्य आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी देवीचे पुजारी श्रीकांत नरहरी कदम, प्रवीण नरहरी कदम, सौ.पद्मजा श्रीकांत कदम, सौ.मंजुषा प्रवीण कदम, कु. समीक्षा कदम, कु. संजना कदम यांच्यासह कदम परिवार व कदम केशव परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोदानासारख्या पवित्र दानाच्या माध्यमातून समाजहिताचा संदेश देत स्वर्गीय लक्ष्मीबाई कदम यांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. धार्मिक परंपरा आणि संस्कार जपत पार पडलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
0
6
7
8
4
1




