Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

८२ हमाल बांधवांना दिवाळी किट वाटप-विजय सर गंगणे मित्र मंडळाचा हृदयस्पर्शी उपक्रम

दिवाळीतही समाजबंध मजबूत करणारा ‘विजय सर गंगणे मित्र मंडळाचा’ उपक्रम

0 7 6 4 8 7

८२ हमाल बांधवांना दिवाळी किट वाटप-विजय सर गंगणे मित्र मंडळाचा हृदयस्पर्शी उपक्रम

दिवाळीतही समाजबंध मजबूत करणारा ‘विजय सर गंगणे मित्र मंडळाचा’ उपक्रम

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व हमाल बांधवांसाठी विजय सर गंगणे मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी स्नेहवितरण सोहळा उत्साहात पार पडला. दीपावलीच्या आनंददायी पर्वाचे औचित्य साधून, हमाल बांधवांना दिवाळी साहित्य किटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास मान कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती, सुहास गायकवाड,बालाजी रोचकरी,संतोष कदम तसेच माजी सभापती विजय गंगणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते तब्बल ८२ दिवाळी किटचे वाटप करण्यात आले.

प्रत्येक किटमध्ये साखर ३ किलो, मैदा ३ किलो, गूळ १ किलो, डालडा, साबण, तेल, शेंगदाणे तसेच दिवाळीला लागणारे सर्व आवश्यक साहित्य अशा स्वरूपात हमाल बांधवांना आनंदाची पोतडी देण्यात आली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव भोपळे राठोड, योगेश चौधरी,पडवळ, देशमुख शिपाई वर्ग, तसेच विजय सर गंगणे मित्र मंडळाचे कार्यकर्ते प्रमोद भोरे,पंकज जमादार, दरेकर आणि पानिपतचे मुख्य सूत्रधार यांनी विशेष मेहनत घेतली.

दरवर्षीप्रमाणे या सामाजिक उपक्रमातून विजय सर गंगणे मित्र मंडळाने समाजबंध अधिक दृढ करत हमाल बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटवली.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे