ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
वेळ अमावस्येला बिबट्याची दहशत! खुंटेवाडीत गाईवर हल्ला; शेतकऱ्यांमध्ये भीती

0
7
6
4
8
6
वेळ अमावस्येला बिबट्याची दहशत! खुंटेवाडीत गाईवर हल्ला; शेतकऱ्यांमध्ये भीती
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे.१४ डिसेंबर रोजी एका शेतकऱ्याच्या गाईवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर,शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा “वेळ अमावस्या” चा उत्सव आज शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी साजरा होत असतानाच १४ डिसेंबर रोजी घटना घडल्याने चिंतेत भर पडली आहे. परंपरेनुसार वेळ अमावस्येला नागरिक कुटुंबासह शेतशिवारात जाऊन उत्सव साजरा करतात. मात्र, बिबट्याच्या हालचालींमुळे अनेक शेतकरी साशंक झाले असून, शिवारात जाण्याबाबत सावध भूमिका घेत आहेत. बिबट्याला वनविभागाने पकडले आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहावे, रात्रीच्या वेळी व एकट्याने शेतात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, उशिरापर्यंत ठोस माहिती मिळू शकली नव्हती.
बिबट्याच्या दहशतीमुळे वेळ अमावस्येच्या उत्सवावर सावट पसरले असून, वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
0
7
6
4
8
6



