अतिवृष्टीतील नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा;जिल्हाधिकारी पूजार यांची अपसिंगा येथे पीक कापणी प्रयोगासाठी उपस्थिती
अतिवृष्टीतील नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा;जिल्हाधिकारी पूजार यांची अपसिंगा येथे पीक कापणी प्रयोगासाठी उपस्थिती
अतिवृष्टीतील नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा;जिल्हाधिकारी पूजार यांची अपसिंगा येथे पीक कापणी प्रयोगासाठी उपस्थिती
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीतील नुकसानीचा नेमका अंदाज घेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथे प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक कापणी प्रयोग पाहणी केली. रँडम पद्धतीने निवडलेल्या दोन शेतकऱ्यांच्या शेतावर जिल्हाधिकारी पूजार यांनी स्वतः उपस्थित राहून सोयाबीन पिकाचे दहा बाय पाच मीटर (अर्धा गुंठा) क्षेत्रात कापणी करून उत्पन्नाची नोंद घेतली.

या वेळी त्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रयोग अत्यंत पारदर्शक आणि काळजीपूर्वक करण्याच्या सूचना दिल्या. या प्रयोगास मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष,जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी महादेव असलकर, तालुका कृषि अधिकारी आबासाहेब देशमुख, महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाचे अधिकारी, ग्रामस्तरीय समिती सदस्य तसेच यावेळ आपसिंगा गावाचे सरपंच राहुल साठे ,ग्रामपंचायत सदस्य राहुल गोरे ,चंद्रकांत डांगे ,पप्पू पाटील ,माजी सरपंच दीपक सोनवणे ,शेतकरी विकास रोंगे, मारुती कोपे ,पोलीस पाटील, ग्राममहसूल अधिकारी गोकूळ शिंदे, सहायक कृषी अधिकारी श्रीमती रंगदळ शेतकरी आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पूजार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक नुकसानीचे योग्य मूल्यमापन होणे अत्यावश्यक असल्याचे सांगत प्रत्यक्ष पाहणीद्वारे प्रशासनाची जबाबदारी पार पाडली.




