Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

करजखेडा चौकात रुक्मिणी ज्वेलर्समध्ये चोरी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास

करजखेडा चौकात रुक्मिणी ज्वेलर्समध्ये चोरी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास

0 7 6 4 8 6

करजखेडा चौकात रुक्मिणी ज्वेलर्समध्ये चोरी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास

बेंबळी,: प्रतिनिधी

करजखेडा चौकातील रुक्मिणी ज्वेलर्स दुकानात अज्ञात चोरट्यांनी धाड टाकून तब्बल रुपये ४ लाख ५९ हजारांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

फिर्यादी महादेव बब्रुवान कदम (वय ६४, रा.कानेगाव,ता. लोहारा,जि. धाराशिव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.९ ऑक्टोबर रोजी रात्री ७.३० ते दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी चॅनेल गेट व शटर तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी दुकानातून ८८ नग चांदीचे पैंजन,६० नग कडदोरे, १० ग्रॅम सोन्याचे मोरणी, तसेच एलईडी टीव्ही व डिव्हीआर असा एकूण रु.४,५९,००० किंमतीचा माल चोरून नेला.

या प्रकरणी बेंबळी पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३३१(४),३०५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास बेंबळी पोलीस करीत आहेत.

चोरीची ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. चोरट्यांचा शोध सुरू आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे