ब्रेकिंगमहाराष्ट्र
अळणीतील ‘दर्शन बार’च्या आड चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धाडसी छापा
१२ संशयित ताब्यात; २१.९० लाखांचा मुद्देमाल जप्त, जुगाराच्या साम्राज्यावर मोठा घाव !

0
7
6
4
8
6
अळणीतील ‘दर्शन बार’च्या आड चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धाडसी छापा
१२ संशयित ताब्यात; २१.९० लाखांचा मुद्देमाल जप्त, जुगाराच्या साम्राज्यावर मोठा घाव !
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, लातूर-ढोकी मार्गावरील अळणी येथील ‘दर्शन बियर बार अँड परमिट रूम’च्या आडोशाने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडसी छापा टाकत तब्बल १२ संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत २१ लाख ९० हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ८ जून २०२६ रोजी परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.गोपनीय माहितीच्या आधारे नियोजनबद्ध धाड पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. ‘दर्शन बियर बार अँड परमिट रूम’च्या मागील बाजूस शेतांनी वेढलेल्या ठिकाणी पैशांच्या बदल्यात कॉईन्स देऊन तीन पत्ती (तिरट) जुगार खेळवला जात असल्याचे निष्पन्न झाले.जुगार अड्ड्याचे ठिकाण अत्यंत दुर्गम आणि सहजासहजी नजरेस न पडणारे असतानाही पोलिसांनी अचूक नियोजन करत धाड टाकली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे संशयितांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही.१२ जण ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून १२ संशयितांना ताब्यात घेतले. बार मालक श्रीपाद नारायण वीर याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांकडून जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्ते, कॉईन्स, मोबाईल फोन, दोन चारचाकी वाहने, चार दुचाकी वाहने तसेच अन्य साहित्य असा एकूण रु. २१ लाख ९० हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचा इशारा
धाराशिव जिल्ह्यात अवैध व्यवसायांना कोणतीही पाठीशी घातली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलीस प्रशासनाने दिला आहे. विशेष म्हणजे, बारच्या आडून सुरू असलेल्या जुगाराच्या या अड्ड्यावर झालेल्या धडक कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील इतर जुगार अड्ड्यांचेही धाबे दणाणले आहेत.सदर कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, सुरेश कासुळे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे तसेच क्यूआरटी (QRT), आरसीपी (RCP) पथकातील अधिकारी, अंमलदार व चालकांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
0
7
6
4
8
6



