Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

बारुळ येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा; धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

बारुळ येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा; धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

0 7 6 4 8 6

 तुळजापूर : तालुक्यातील बारुळ येथे ग्रामदैवत श्री बाळेश्वर यांच्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवात यंदाही भाविकांसह कला-संस्कृतीप्रेमींना मोठी पर्वणी मिळणार आहे.उत्सवानिमित्त भारूड, अभंग, महाअभिषेक, श्रींची पालखी मिरवणूक आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परंपरेनुसार रविवार, दि. १५ रोजी श्री बाळेश्वरांची महापूजा व महाअभिषेक होणार असून सायंकाळी किर्तनकार ह.भ.प. सौ. निकिताताई स्वामी महाराज (ता. नायगाव, जि. नांदेड) यांचे भावपूर्ण शिवकिर्तन आयोजित करण्यात आले आहे. सोमवार, दि. १६ रोजी श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून त्यासोबत शोभेचे दारूकाम होणार आहे.मंगळवार, दि. १७ रोजी भारूड कार्यक्रम, रक्तदान शिबिर तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी सायंकाळी जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सलग १४ वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.या स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, सोलापूर, नांदेड, लातूर तसेच धाराशिव जिल्ह्यातील अनेक नामवंत व नवोदित नृत्यस्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतून माधुरी पवार यांच्यासह अनेक कलाकारांना ओळख मिळाली आहे. उत्कृष्ट नियोजन, स्पर्धकांचा सन्मान आणि पारदर्शक परीक्षक पद्धती हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य मानले जाते.यंदा या स्पर्धेत एकूण १ लाख ५१ हजार रुपयांची आकर्षक बक्षिसे वितरित करण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी मो. नं. ९४२२६०५९४५, ९४२२६०५९७०, ९३२५०८३१९५, ९४२३६०५९४१, ९७७५२३०२७०, ९४२२६०५९०४, ९७७३४२७८१२, ९४२२६०५८६४, ९८५०४६०२२८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे