Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

महिषासुराच्या स्मृतीचा नगारा; तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक मिरवणुकीला भक्तांची गर्दी

महिषासुराच्या स्मृतीचा नगारा; तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक मिरवणुकीला भक्तांची गर्दी

0 7 6 4 8 6

महिषासुराच्या स्मृतीचा नगारा; तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक मिरवणुकीला भक्तांची गर्दी

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे पारंपरिक नगारा मिरवणूक मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडली. विधीवत पूजन करून नवीन नगारा बैलगाडीतून मंदिरात आणण्यात आला. विशेष म्हणजे, ही गाडी बैलाऐवजी भक्तांनी स्वतः ओढत देवीप्रती श्रद्धा व्यक्त केली.

पुराणानुसार महिषासुराच्या वधानंतर त्याच्या चमड्यापासून तयार झालेला नगारा देवीच्या पूजा-आरतीत वापरण्याचा वर देण्यात आला होता. या नगाऱ्याच्या नादाने नकारात्मकता दूर होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
मिरवणुकीत तहसीलदार माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, तिन्ही महंत नगरसेविका सौ. प्रियंकाताई विजय गंगणे, विजय गंगणे, विशाल रोचकरी, व मंदिर संस्थानचे अधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे