Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

वडगाव गणात कमळ विरुद्ध मशाल; निवडणुकीचा थरार शिगेला

वडगाव गणात मतदारांचा कस; कमळ की मशाल?

0 7 6 4 8 6

वडगाव गणात कमळ विरुद्ध मशाल; निवडणुकीचा थरार शिगेला

वडगाव गणात मतदारांचा कस; कमळ की मशाल?

धाराशिव : पंचायत समिती वडगाव गणातील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरत असून भारतीय जनता पार्टीकडून पाटील प्रमोद भाऊसाहेब हे कमळ चिन्हावर रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून मोरे अंकुश शंकर हे मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने गणात राजकीय वातावरण तापले आहे.
भाजपचे उमेदवार पाटील प्रमोद भाऊसाहेब यांनी विकासाच्या मुद्द्यावर प्रचाराची आघाडी घेतली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शेतकरी प्रश्न, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. वडगाव गणाचा सर्वांगीण विकास हाच माझा अजेंडा असून, मतदारांनी दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही,असे ते सांगत आहेत. त्यांच्या प्रचाराला पक्ष कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे भक्कम पाठबळ लाभत आहे.दुसरीकडे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार मोरे अंकुश शंकर यांनी जनसंपर्कावर भर देत प्रचार सुरू ठेवला आहे. स्थानिक प्रश्न, ग्रामविकास निधीचा योग्य वापर, युवकांना रोजगार आणि महिलांसाठी सशक्तीकरणाच्या योजना यांचा मुद्दा ते ठळकपणे मांडत आहेत. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी पंचायत समितीमध्ये ठाम आवाज उठवणार,असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला आहे.दोन्ही उमेदवारांकडून घरोघरी जाऊन प्रचार, बैठका, तसेच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला जात आहे. गावागावात कमळ आणि मशाल यांच्यातील लढत चर्चेचा विषय ठरत असून, कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.आता निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचाराचा जोर वाढत चालला असून, मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे