ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूर : सिंहासन पास प्रकरणावरून चौकशीची मागणी तहसीलदार व मंदिर व्यवस्थापकांवर पदाच्या दुरुपयोगाचा आरोप; निलंबनाची मागणी
तुळजापूर : सिंहासन पास प्रकरणावरून चौकशीची मागणी तहसीलदार व मंदिर व्यवस्थापकांवर पदाच्या दुरुपयोगाचा आरोप; निलंबनाची मागणी

0
7
6
4
8
6
तुळजापूर : सिंहासन पास प्रकरणावरून चौकशीची मागणी
तहसीलदार व मंदिर व्यवस्थापकांवर पदाच्या दुरुपयोगाचा आरोप; निलंबनाची मागणी
तुळजापूर : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानातील सिंहासन पास वितरणात अनियमितता झाल्याचा आरोप करत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश प्रभाकर पाटील यांनी विविध शासकीय कार्यालयांना निवेदन दिले आहे.निवेदनात नमूद केल्यानुसार, मंदिर संस्थानामार्फत सिंहासन दर्शनासाठी ऑनलाइन पास प्रणाली सुरू असून दररोज सकाळी व सायंकाळी मिळून दहा सिंहासनांचे नियोजन करण्यात येते. मात्र, दि. २१ एप्रिल रोजी नियमानुसार पाच सिंहासन होणे अपेक्षित असताना सहा सिंहासन झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अतिरिक्त सिंहासन कशा आधारावर देण्यात आले, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणात आर्थिक तडजोड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित तहसीलदार तसेच मंदिर व्यवस्थापक यांनी पदाचा दुरुपयोग करून मनमानी कारभार केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे.
श्री तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन पास प्रकरण गंभीर; स्थानिक काही पुजाऱ्यानी सुरक्षारक्षकांला दमदाटी झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
— श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,धाराशिव.
मंदिरातील गंभीर प्रकार घडत असताना SISPL Security Company कडून वेळेवर माहिती न देणे ही मोठी निष्काळजीपणा ठरली आहे. या निष्काळजीपणाबद्दल कंपनीवर एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मंदिर संस्थानच्या वतीने सिंहासनासाठी निश्चित करण्यात आलेले ११०० रु.ऑनलाईन शुल्क पारदर्शक पद्धतीनेच आकारलेले आहे., या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून सर्व बाबींची काटेकोर पडताळणी केली जात आहे. दोषी आढळणाऱ्यांवर नियमांनुसार कठोर व तात्काळ कारवाई करण्यात येईल.
— माया माने
तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन मंदिर संस्थान
0
7
6
4
8
6





