Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूर पोलिस ठाण्यात ACB चा सापळा;सहाय्यक उपनिरीक्षक श्रीनिवास आरदवाड ५ हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात

पूर्वी १० हजार घेतल्यानंतरही पुन्हा लाचेची मागणी

0 7 6 4 8 7

पूर्वी १० हजार घेतल्यानंतरही पुन्हा लाचेची मागणी

तुळजापूर पोलिस ठाण्यात ACB चा सापळा;सहाय्यक उपनिरीक्षक श्रीनिवास आरदवाड ५ हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात

तुळजापूर : तुळजापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाला (एएसआय) लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडल्याने पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. श्रीनिवास रामदास आरदवाड (वय अंदाजे ४०) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त तक्रारीनुसार, तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्यात कलम वाढू न देणे आणि मोटारसायकल जप्त न करणे यासाठी आरदवाड यांनी यापूर्वीच १० हजार रुपयांची लाच घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतरही त्यांनी पुन्हा १५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने ACB कडे केली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी विभागाकडे तक्रार दाखल केली.तक्रारीची पडताळणी करण्यासाठी ACB पथकाने तक्रारदार व पंचाला तुळजापूर पोलिस ठाण्यात पाठवले असता आरदवाड यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बुधवारी सायंकाळी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरदवाड यांना ACB पथकाने तुळजापूर पोलिस ठाण्याच्या आवारातच रंगेहात पकडले.या कारवाईनंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीच्या अंगझडतीत ५ हजार ३०० रुपये, विवो कंपनीचा मोबाईल, पोलिस ओळखपत्र, चाव्यांचा गुच्छ, पेन, कंगवा आणि काळ्या रंगाचा चष्मा आढळून आला आहे.दरम्यान, आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून मोबाईलची तपासणी करून आवश्यकतेनुसार जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय वगरे करत असून पोलिस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. तसेच पोलिस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.ACB च्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले असून, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

▪️होळीच्या पार्श्वभूमीवर रंगात भंग

तीर्थक्षेत्र तुळजापूर हे गावठी कट्टा आणि इतर गुन्हेगारी घटनांमुळे अधूनमधून चर्चेत येत असताना, आता पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यालाच ACB ने लाच घेताना पकडल्याने शहराच्या प्रतिमेला पुन्हा धक्का बसला आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या कारवाईमुळे पोलिस विभागातही मोठी खळबळ उडाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे