ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
श्री तुळजाभवानीच्या पुण्यभूमीत “मशाल”पूर्णतःविझली; तुळजापूरकरानी विनोद गंगणे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले!
खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिष्ठा धुळीस; मशालधारी पाचही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

0
6
7
8
4
1
श्री तुळजाभवानीच्या पुण्यभूमीत “मशाल”पूर्णतःविझली;
तुळजापूरकरानी विनोद गंगणे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले!

खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिष्ठा धुळीस; मशालधारी पाचही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
तुळजापूर | प्रतिनिधी
तीर्थक्षेत्र तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन भूमीत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची “मशाल” पेटण्याआधीच विझली असून, तुळजापूर नगरपालिकेच्या निकालाने राजकीय वास्तव सर्वांसमोर उघड केले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रतिष्ठेची मानली गेलेली ही निवडणूक त्यांच्या गटासाठी जबरदस्त धक्का ठरली असून, जनतेने स्पष्ट आणि ठाम शब्दांत “नकार” दिल्याचे चित्र दिसून आले.नगरपालिकेच्या निवडणुकीत “मशाल” चिन्हावर पाच अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले होते. मात्र कामापेक्षा आरोप, प्रसिद्धी आणि सोशल मीडियावरील दिखाऊ राजकारणावर भर देणाऱ्या या गटाला जनतेने सपशेल अपयशी ठरवले.एकही उमेदवार निवडून न येता, पाचही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणे ही तुळजापूरच्या राजकारणातील ऐतिहासिक बाब ठरली आहे. दरम्यान ड्रग्स प्रकरणाच्या नावाखाली आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि नगराध्यक्ष विनोद ऊर्फ पिटू गंगणे यांच्यावर चिखलफेक करण्याचा केलेला प्रयत्न मतदारांनी पूर्णतः धुडकावून लावला. विकासकामे, प्रशासनावर पकड आणि जनतेशी असलेला थेट संपर्क यामुळे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी निवडणुकीत राजकीय षटकार लगावत विरोधकांना चारीमुंड्या चित केले. धाराशिव जिल्ह्यातील एकूण निकाल पाहता भाजप आणि शिंदे शिवसेनेचे प्रत्येकी चार नगराध्यक्ष विजयी झाले असून, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना जिल्ह्यात पूर्णतः नामशेष झाल्याचे स्पष्ट झाले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्यक्ष कामाऐवजी केवळ प्रतिष्ठेच्या लढाया लढणारे खासदार ओमराजे निंबाळकर हे आता फक्त भाषणं,रिल्स आणि आरोपांपुरते मर्यादित राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.मशालधारी उमेदवारांची दारुण अवस्था :

▪️जाधव लक्ष्मीकांत रामचंद्र – ७४ मतदान मिळाले
▪️कोमल आनंद रोचकरी – ६२७ मतदान मिळाले
▪️अर्जुन पोपटराव साळुंके – २६ मतदान मिळाले
▪️कांबळे मीना अभिमान – १०२ मतदान मिळाले
▪️कृष्णा सचिन अमृतराव – ५९ मतदान मिळाले
▪️ माजी नगरसेवक राहुल विनायराव खपले – ५६७ मतदान मिळाले
▪️शितल भोलेनाथ लोकरे –६३ मतदान मिळाले

या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणे म्हणजे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी आखलेली राजकीय रणनिती किती अचूक होती, याचीच साक्ष आहे.
एकूणच तुळजापूरच्या जनतेने कोण काम करणारे आणि कोण केवळ बोलघेवडे हे अचूक ओळखत,विनोद गंगणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “मशाल” विझवून विकासाला संधी देणारा हा निकाल ठरला आहे, हेच या निवडणुकीचे खरे राजकीय वास्तव आहे.
0
6
7
8
4
1



