Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

अंतर्गत बलात्कार प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन; ॲड. विशाल साखरे यांचा प्रभावी युक्तिवाद ठरला निर्णायक

0 7 6 4 9 7

अंतर्गत बलात्कार प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन;
ॲड. विशाल साखरे यांचा प्रभावी युक्तिवाद ठरला निर्णायक

धाराशिव | ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अंतर्गत बलात्काराच्या गंभीर आरोपातील प्रकरणात धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर करून दिलासा दिला आहे. गुन्हा क्रमांक ४३६/२०२५ अन्वये आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर प्रकरणात तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झालेले असताना आरोपीच्या वतीने सुप्रसिद्ध फौजदारी वकील ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी न्यायालयासमोर अत्यंत सखोल व कायदेशीरदृष्ट्या भक्कम असा युक्तिवाद सादर केला. यामध्ये पीडित व आरोपी यांच्यात यापूर्वी चेक बाऊन्स संदर्भात आर्थिक वाद निर्माण झाला होता व त्या अनुषंगाने कायदेशीर नोटीस दिल्यानंतरच सदर तक्रार दाखल करण्यात आली असल्याचा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.तसेच तपास पूर्ण झाल्याने आरोपीस पुढील कोठडीत ठेवण्याची कोणतीही आवश्यकता नसून, दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरही कोठडी लावणे हे कायद्याच्या मूलभूत तत्वांना धरून नसल्याचा ठोस युक्तिवाद ॲड. साखरे यांनी मांडला. तक्रार द्वेषबुद्धीने व सूडभावनेतून दाखल झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या आढळून येत असल्याची बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.ॲड. विशाल साखरे यांचा प्रभावी, मुद्देसूद आणि न्यायालयीन दृष्टिकोनातून समतोल असा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर करण्याचा आदेश पारित केला. या प्रकरणात ॲड. मंजुषा विशाल साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. शुभम तांबे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. संकेत गोरे, ॲड. अमित गोळे यांच्यासह ओंकार कोरेगांवकर, रोहित लोमटे व महेश पवार यांनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे