ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
प्रभाग २ : आठ उमेदवार… कठीण समीकरणे!’कदम घराण्याचा प्रभाव, पवार–रोचकरींची उपस्थिती आणि महिला उमेदवारांची दमदार एंट्री
प्रभाग २ : आठ उमेदवार… कठीण समीकरणे!’कदम घराण्याचा प्रभाव, पवार–रोचकरींची उपस्थिती आणि महिला उमेदवारांची दमदार एंट्री
0
6
7
8
4
1
प्रभाग २ : आठ उमेदवार… कठीण समीकरणे!’कदम घराण्याचा प्रभाव, पवार–रोचकरींची उपस्थिती आणि महिला उमेदवारांची दमदार एंट्री

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ हा सर्वाधिक चर्चेत असलेला प्रभाग ठरत आहे. अवघ्या आठ उमेदवारांच्या शर्यतीत समीकरणे इतकी गुंतागुंतीची झाली आहेत की, कोण वरचढ ठरेल याची स्पष्ट दिशा आजवर दिसून येत नाही. कदम घराण्याचा पारंपरिक प्रभाव, पवार–रोचकरी कुटुंबांची उपस्थिती, महिला उमेदवारांची वाढती ताकद आणि स्थानिक जनमत… या सर्वांचा मिलाफ प्रभाग २ मध्ये रंगतदार, तापलेली आणि तगडी लढत उभी करीत आहे.

या प्रभागात उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये औदुंबर कदम पंडितराव, शुभम कमलचंद कदम, अजिंक्य युवराज खंदारे, जीवन उपेंद्र कदम, सौ.नीता दिनेश क्षीरसागर,सौ. कोमल आनंद रोचकरी, सौ. सुरेखा नितीन पवार आणि मीनाबाई रामचंद्र सोमाजी या आठ उमेदवारांची नावे अग्रस्थानी आहेत.

कदम घराण्याचा प्रभाव अजूनही ठळक तीन उमेदवार कदम घराण्यातील असल्याने मतांचे तुकडीकरण हा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. मात्र, माजी नगरसेवक म्हणून औदुंबर कदम यांचा अनुभवी नेतृत्वाचा वारसा आणि स्थानिकांशी असलेले सखोल नाते यामुळे त्यांची पकड आजही भक्कम असल्याचे चित्र आहे. प्रभागातील जुन्या कामांची आठवण आणि कार्यकर्त्यांचे जाळे त्यांना मोठी उभारी देत आहे.

नवीन चेहऱ्याचा जोरदार प्रभाव : सौ. नीता दिनेश क्षीरसागर या नवीन चेहरा असूनही अल्पावधीतच त्यांनी प्रभागात प्रभावी पकड निर्माण केली आहे. महिला मतदारांचा कल, घराघरातील संपर्क, शांत–सुसंस्कृत शैली आणि ‘नव्या उमेदवाराला एक संधी’ या भावनेला मिळणारा प्रतिसाद… या सर्वांचा फायदा त्यांना होताना दिसत आहे. त्यांच्या उमेदवारीने प्रभागात समीकरणांना वेगळे वळण दिले आहे.

रोचकरी–पवार घराण्यांचेही जोरदार अस्तित्व कोमल आनंद रोचकरी आणि सुरेखा नितीन पवार या दोन्ही महिला उमेदवारांची उपस्थितीही या लढतीला अधिक टोकदार बनवत आहे. दोन्ही कुटुंबांचे स्थानिकांशी असलेले जुने संबंध आणि संघटनेतील सक्रीय भूमिका यामुळे महिलांचा आणि तरुणांचा ओढा त्यांच्याकडे जाणवत आहे.


२ डिसेंबरला गुप्त मतदान… ३ डिसेंबरला कोणाचा कब्जा?
प्रभाग २ मधील आठही उमेदवार तगडे असल्याने जनतेत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. कोणाला ‘वॉर्डचा मुकुट’ मिळवणार, कोणाची मते तुटणार, कोण वरचढ ठरणार…? याची स्पष्ट दिशा मतदानानंतरच मिळणार आहे.

२ डिसेंबरला होणारे गुप्त मतदान आणि ३ डिसेंबरच्या निकालानंतर प्रभाग २ मधील खऱ्या जनतेचा निर्णय समोर येईल.प्रभाग २ : लढत तगडी… समीकरणे कठीण… आणि निकाल रोमांचक ठरणार, हे निश्चित!


0
6
7
8
4
1



