Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

श्री गॅस एजन्सीकडून नगराध्यक्ष व नगरसेवकांचा जाहीर सत्कार; विकासासाठी हातात हात !

श्री गॅस एजन्सीकडून नगराध्यक्ष व नगरसेवकांचा जाहीर सत्कार; विकासासाठी हातात हात !

0 7 6 4 8 6

श्री गॅस एजन्सीकडून नगराध्यक्ष व नगरसेवकांचा जाहीर सत्कार; विकासासाठी हातात हात !

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास,नागरी सुविधांचा विस्तार आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून लढणारे विद्यमान नगराध्यक्ष विनोद उर्फे पिटू गंगणे व सर्व नगरसेवक तसेच सामाजिक क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या कार्यकर्त्यांचा श्री गॅस एजन्सीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. हा सन्मान सोहळा श्री गॅस एजन्सीच्या संचालिका श्रीमती कविता मलबा मॅडम यांच्या हस्ते व त्यांच्या वतीने उत्साहात पार पडला.

शहराच्या विकासाची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या लोकप्रतिनिधींना प्रोत्साहन देणे आणि समाजासाठी निःस्वार्थ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी श्रीमती कविता मलबा यांनी व्यक्त केले. नगरपरिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विकासकामांमध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता,रस्ते, ड्रेनेज,आरोग्य व इतर मूलभूत सुविधांचा समावेश असून या सर्व कामांसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही नमूद करण्यात आले.सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्षांनी सांगितले की, जनतेच्या विश्वासावर आम्ही निवडून आलो असून त्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी विकास हाच आमचा अजेंडा आहे.

सामाजिक संस्थांचा सकारात्मक सहभाग मिळाल्यास शहराच्या प्रगतीचा वेग दुप्पट होईल. या वेळी भाजपाचे पदाधिकाऱ्यांच्या कार्याची विशेष दखल घेत त्यांचे योगदान केवळ गौरवास पात्र नाही तर प्रेरणादायी असल्याचेही वक्तव्य करण्यात आले. समाजात घडणारा प्रत्येक सकारात्मक बदल हा लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या समन्वयातूनच शक्य असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.कार्यक्रमास नगराध्यक्ष,सर्व नगरसेवक,भाजपाचे पदाधिकारी, श्री गॅस एजन्सीचे पदाधिकारी,कर्मचारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाळ्यांच्या गजरात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात हा सत्कार सोहळा पार पडला. तुळजापूर शहराच्या विकासासाठी एकत्र येण्याचा निर्धार या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे