ब्रेकिंगमहाराष्ट्र
धाराशिव,कळंब,तुळजापूर “कमळ” फुलले; पाच पंचायत समित्यांवर महायुतीचे वर्चस्व
धाराशिव,कळंब,तुळजापूर "कमळ" फुलले; पाच पंचायत समित्यांवर महायुतीचे वर्चस्व

0
7
6
4
9
7
धाराशिव,कळंब,तुळजापूर “कमळ” फुलले; पाच पंचायत समित्यांवर महायुतीचे वर्चस्व
धाराशिव : जिल्हा मुख्यालय असलेल्या धाराशिवसह तुळजापूर आणि कळंब पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडणुकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत महायुतीने मुसंडी मारत तिन्ही ठिकाणी विजय मिळवला असून या निकालामुळे जिल्ह्यात आमदार पाटील यांची राजकीय पकड अधिक घट्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कळंब पंचायत समितीची निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरली.

येथे महायुती आणि महाविकास आघाडीचे संख्याबळ समसमान (टाय) झाल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. दोन्ही बाजूंनी सभापती व उपसभापती पदासाठी अर्ज दाखल झाल्यामुळे पेच निर्माण झाला. अखेर निवडणूक नियमांनुसार ‘ईश्वरचिठ्ठी’ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या नशिबाच्या खेळातही महायुतीचेच वर्चस्व ठरले आणि दोन्ही पदे महायुतीच्या झोळीत पडली.केवळ धाराशिव, कळंब आणि तुळजापूरच नव्हे, तर उमरगा आणि लोहारा पंचायत समितीवरही महायुतीने निर्विवाद बहुमत मिळवत आपला झेंडा फडकवला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाचही पंचायत समित्यांवर महायुतीचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

तुळजापूर मध्ये कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेत महायुतीच्या उमेदवारांनी विजयोत्सव साजरा केला. ठिकठिकाणी गुलाल उधळून आणि फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
या विजयाबाबत बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, “हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या कष्टांचा आहे. नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींनी जनसेवेला प्राधान्य देत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहावे.”आमदार पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यां

मध्ये मोठा उत्साह संचारला असून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
0
7
6
4
9
7



