Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

“एक राज्य, एक कायदा’ची मागणी; आरक्षण रद्दसाठी सामाजिक कार्यकर्त्याचा एल्गार”

“एक राज्य, एक कायदा’ची मागणी; आरक्षण रद्दसाठी सामाजिक कार्यकर्त्याचा एल्गार”

0 7 6 4 8 6

“एक राज्य, एक कायदा’ची मागणी; आरक्षण रद्दसाठी सामाजिक कार्यकर्त्याचा एल्गार”

तुळजापूर : महाराष्ट्रात जातीयवाद आणि सामाजिक तेढ वाढत असल्याचा आरोप करत संपूर्ण आरक्षण व्यवस्था रद्द करून “एक राज्य, एक कायदा” लागू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश देशमुख यांनी दि.२१ मे रोजी या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले असून मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास दि.२ जून रोजी लाक्षणिक उपोषणाचा इशाराही दिला आहे.

सामाजिक कार्यकर्ते महेश देशमुख हे राहणार मांजरी ता. हवेली जि. पुणे यांनी सादर केलेल्या निवेदनात आरक्षणामुळे समाजात जातीय भेदभाव आणि संघर्ष वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. “गरीबी कोणत्याही जाती-धर्माची नसते. त्यामुळे सर्व नागरिकांना समान न्याय मिळावा आणि गुणवत्तेला प्राधान्य देणारी व्यवस्था निर्माण व्हावी,” अशी भूमिका त्यांनी मांडली.तसेच काही कायद्यांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. “राज्याच्या विकासासाठी समान नागरी हक्क व समान कायदा आवश्यक आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्यास दि. २ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते महेश देशमुख यांची स्वाक्षरी आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे