Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

भूम तालुक्यात गांजाची अवैध लागवड उध्वस्त : ५२ झाडे जप्त, शेतकरी अटकेत

0 7 6 4 8 6

भूम तालुक्यात गांजाची अवैध लागवड उध्वस्त : ५२ झाडे जप्त, शेतकरी अटकेत

धाराशिव | प्रतिनिधी

भूम तालुक्यातील देवळाली (ता. भूम) येथे गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) छत्रपती संभाजीनगर कृती विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईत ५२ गांजाची झाडे जप्त करून संबंधित आरोपीस अटक करण्यात आली आहे.दि. २३ जानेवारी रोजी ANTF ला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की देवळाली शिवारातील शेत गट क्रमांक ४६२ मध्ये गांजाची अवैध लागवड करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे ANTF पथकाने तात्काळ छापा टाकला असता शेतात गांजाची लागवड करून त्याची देखभाल व रखवाली सुरू असल्याचे निष्पन्न झाले.

पंचनाम्यानंतर लहान-मोठी एकूण ५२ झाडे उपटून त्यांचे वजन करण्यात आले असता सुमारे १६ किलो गांजाची झाडे मिळून आली. या मालाची अंदाजे किंमत ७१ हजार रुपये असून तो जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गोकुळदास रावसाहेब हावळे (वय ५०, रा. देवळाली, ता. भूम) यास अटक करण्यात आली आहे.
या कारवाईनंतर पंरडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब) व ११(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत, पोलीस अधीक्षक अजीत टिके, उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकात वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, शैला टेळे, सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरफाळे, नितीन जाधव, रविंद्र साळवे, सुरज जोनवाल, ज्ञानेश्वर चव्हाण व अम्रपाली सूर्यवंशी सहभागी होते.
दरम्यान, युवा वर्ग नशेच्या विळख्यात अडकू नये यासाठी अशा प्रकारच्या अमली पदार्थ लागवड, साठवण व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा ANTF कडून देण्यात आला असून, नागरिकांनी अशा गैरप्रकारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे