ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
सतीश कदम (चिवचिवे )आत्महत्या प्रकरण : डोंगरे पिता–पुत्रांवरील गुन्हा उच्च न्यायालयात रद्द
सतीश कदम (चिवचिवे )आत्महत्या प्रकरण : डोंगरे पिता–पुत्रांवरील गुन्हा उच्च न्यायालयात रद्द
0
6
7
8
4
1
सतीश कदम (चिवचिवे)आत्महत्या प्रकरण : डोंगरे पिता–पुत्रांवरील गुन्हा उच्च न्यायालयात रद्द
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूरातील सतीश कदम (चिवचिवे ) आत्महत्या प्रकरणात किसन डोंगरे व त्यांचे पुत्र गुरुराज आणि नागेश डोंगरे यांच्याविरुद्ध तुळजापूर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला. न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
घटनाक्रम असा,
सतीश कदम (चिवचिवे )व किसन डोंगरे हे पूर्वी व्यावसायिक भागीदार होते. १९८९ साली तुळजापूर–नळदुर्ग मार्गावर त्यांनी संयुक्तपणे जमीन खरेदी करून त्यातील २६ प्लॉट्सचे नियोजन केले होते. त्यापैकी २५ प्लॉट्सची विक्री झाली होती, तर एक प्लॉट विकायचा राहिला होता.
सतीश कदम (चिवचिवे ) यांचा मुलगा पुणे येथे चष्म्याचे दुकान सुरू करणार असल्याने प्लॉट विक्रीचे प्रयत्न सुरू होते. मात्र पूर्वी विकलेल्या प्लॉट्सबाबत सहमतीनुसार सर्व व्यवहार झाले असल्याचे लेखी नमूद करावे, असा आग्रह किसन डोंगरे व त्यांच्या मुलांकडून होत असल्याचे फिर्यादीत नमूद होते. या वादातून सतीश कदम (चिवचिवे ) यांना मानसिक त्रास झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
याच त्रासाला कंटाळून त्यांनी २५ नोव्हेंबर २०२३ रोजी झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारासाठी रुग्नालयात दाखल केल्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे पुत्र प्रसाद कदम यांनी तुळजापूर पोलिस स्टेशनमध्ये डोंगरे पिता–पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
उच्च न्यायालयात युक्तिवाद
गुन्हा रद्द करण्यासाठी डोंगरे पिता–पुत्रांनी ॲड. जयदीप माने (सोलापूर) यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान पोलिसांनी चार्जशीटही दाखल केली होती. त्याविरोधातही आरोपींकडून रद्द करण्याचा अर्ज दाखल झाला होता.
सुनावणीवेळी ॲड. माने यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले की—
• प्लॉट विक्रीचे सर्व पैसे सतीश कदम यांनी चेकद्वारे स्वीकारले असून रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा आहे.
• मयत कदम हे उच्च रक्तदाब व मधुमेहाने त्रस्त होते तसेच व्यसनाधीन होते.
• रासायनिक विश्लेषणासाठी पोटातील द्रव्य पाठवले गेले नाही.
• आत्महत्येस कारणीभूत धरूनच एकतर्फी तपास करून चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.या सर्व बाबींचा विचार करून खंडपीठाने डोंगरे पिता–पुत्रांविरुद्धचा गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले.
दोन्ही बाजूंनी दमदार युक्तिवाद
या प्रकरणात आरोपींचे प्रतिनिधित्व ॲड. जयदीप माने यांनी केले. सरकारतर्फे अँड. व्ही. के. कोटेचा तर मूळ फिर्यादीतर्फे ॲड. बी. आय. महाजन यांनी काम पाहिले.
महत्त्वाचा निकाल असल्याने या निर्णयाला ऑल महाराष्ट्र लॉ रिपोर्टर–क्रिमिनल, पान क्र. २३६७ वर स्थान मिळाले आहे.
press note quashing ह्या लिंक मध्ये उच्च न्यायालयाचा आदेश आहे.आवर्जून पहावे
0
6
7
8
4
1



