Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

वयोवृद्ध महिलेचा तुळजापुरात बेपत्ता; पोलिसांकडून शोध मोहीम सुरू

0 7 6 4 8 6

वयोवृद्ध महिलेचा तुळजापुरात बेपत्ता; पोलिसांकडून शोध मोहीम सुरू

तुळजापुर : ज्ञानेश्वर गवळी

श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात आलेल्या एका वयोवृद्ध महिलेचा अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तुळजापुर पोलीस ठाण्यात मिसींगची नोंद करण्यात आली असून पोलीस प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू आहे.
धारवाड (कर्नाटक) येथील रहिवासी मुकेश धनसिंग गवळी (वय ४६, रा. प्लॅट नं. ३२, हातरगी मालापुर के.सी. पार्क, ता. हुबळी, जि. धारवाड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी ते आपल्या कुटुंबासह श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुर येथे आले होते. त्यांच्या आई लीलाबाई धनसिंग गवळी (वय ७५) या वयोवृद्ध असल्याने सकाळी सुमारे ८ वाजता महाद्वाराच्या आतील बाजूस त्यांना बसवून कुटुंबीय दर्शनासाठी गेले. दर्शन घेऊन परत आल्यानंतर लीलाबाई गवळी त्या ठिकाणी आढळून आल्या नाहीत.यानंतर कुटुंबीयांनी मंदिर परिसर तसेच तुळजापुर शहरात सर्वत्र शोध घेतला; मात्र आजपर्यंत त्या मिळून आलेल्या नाहीत. अखेर तुळजापुर पोलीस ठाण्यात मिसींग क्रमांक ६४/२०२५ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
मिसिंग महिलेचे वर्णन :
नाव – लीलाबाई धनसिंग गवळी
वय – ७५ वर्षे ,रंग – सावळा,उंची – सुमारे ५ फूट ६ इंच,शिक्षण – निरक्षर,पोशाख – गुलाबी रंगाची साडी,ओळख – डाव्या हाताच्या पोटरीवर गोंदलेले चिन्ह, पूर्ण दात पडलेले
भाषा – मराठी, हिंदी व कन्नड बोलता येते,केस – पूर्णपणे पांढरे

वरील वर्णनाची महिला कोणत्याही पोलीस ठाणे हद्दीत आढळून आल्यास तात्काळ तुळजापुर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संपर्क :
पोलीस ठाणे तुळजापुर
पो.हे.कॉ. बी.डी. कामतकर – ९६०७९९८७१५ /९८२३१८११५१

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे