Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पंचायत समिती सभापती आरक्षणात मोठी उलथापालथ; धाराशिव जिल्ह्यात महिला आघाडीवर!.

तुळजापूर,भूम, लोहारा पुरुषांसाठी-उर्वरित ठिकाणी महिलांचे वर्चस्व...

0 6 7 8 4 1

पंचायत समिती सभापती आरक्षणात मोठी उलथापालथ; धाराशिव जिल्ह्यात महिला आघाडीवर!..

तुळजापूर,भूम, लोहारा पुरुषांसाठी-उर्वरित ठिकाणी महिलांचे वर्चस्व…

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

धाराशिव जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर महिलांना चार ठिकाणी संधी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींच्या हस्ते काढल्या चिठ्ठ्या

जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांसाठी सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले असून,या निकालामुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.येत्या काही दिवसांत या आरक्षणावरून विविध पक्षांमध्ये नाराजी, गाठीभेटी व नव्या रणनीती रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

प्राप्त माहितीनुसार
◾धाराशिव पंचायत समिती हे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
◾कळंब पंचायत समितीलाही सर्वसाधारण महिला प्रवर्ग ठरला आहे.
◾ लोहारा पंचायत समितीचे पद ओबीसी (पुरुष) प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे.
◾ भूम पंचायत समितीला सर्वसाधारण (पुरुष) प्रवर्ग मिळाला आहे.
◾ परांडा पंचायत समितीचे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे.
◾वाशी पंचायत समितीत ओबीसी महिला प्रवर्गाला आरक्षण देण्यात आले आहे.
◾तुळजापूर पंचायत समितीचे पद सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी तर
◾उमरगा पंचायत समितीचे पद अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे.

या आरक्षणामुळे अनेक ठिकाणी सत्ताधारी व विरोधकांमध्ये नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.काही ठिकाणी महिला आरक्षणामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असून, तर काही ठिकाणी जुन्या अनुभवी नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

राजकीय पातळीवर ही आरक्षण सोडत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीचे ‘प्रीव्ह्यू’ मानले जात असून, प्रत्येक तालुक्यात आता उमेदवारांच्या चाचपणीस जोर आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे