Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी घेतले दिवाळीचे मंगल दर्शन !

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी घेतले दिवाळीचे मंगल दर्शन !

0 7 6 4 9 7

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी घेतले दिवाळीचे मंगल दर्शन !

धाराशिव, प्रतिनिधी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा लाभ धाराशिव जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी सहकुटुंब दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घेतला.

दिवाळी पाडव्या निमित्ताने तुळजाभवानी मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजलेले वातावरण भक्तांच्या उत्साहात अधिक भर घालत होते. दर्शनावेळी भक्तीभाव, आनंद आणि आध्यात्मिकतेचा संगम जाणवत होता.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी देवीच्या चरणी जिल्ह्याच्या जनतेच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दिवाळीही यंदा गोड झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे आणि तत्पर प्रशासनिक कामगिरीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वीच अनुदान जमा करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाकडून जिल्हाधिकाऱ्यांविषयी कौतुकाची लाट उसळली आहे.धाराशिव जिल्ह्यात प्रशासन आणि भक्तिभाव दोन्हींचे सुंदर दर्शन या दिवाळी पाडव्याच्या दिवशी घडले — आई तुळजाभवानीच्या कृपेने सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे