ब्रेकिंगमहाराष्ट्र
वेताळ नगर परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी; नागरिक व भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
वेताळ नगर परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी; नागरिक व भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

0
7
6
4
9
7
वेताळ नगर परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी; नागरिक व भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
तुळजापूर : शहरातील प्रभाग क्र. ०८ मधील वेताळ नगर परिसरात नागरिक व भाविकांच्या सुरक्षेसाठी Ai सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी पुढे आली आहे. याबाबत नगरसेविका सौ. ज्योती आनंद सावंत यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला आहे.
तुळजापूर शहरात पोलीस अधीक्षक, धाराशिव यांच्या विभागामार्फत विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, प्रभाग क्र. ०८ मधील वेताळ नगर येथे असलेल्या समाजमंदिर परिसरात काही पुजारी व्यवसाय करणारे नागरिक वास्तव्यास असून, त्या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. विशेषतः रात्रीच्या वेळीही भाविकांची ये-जा सुरू असल्याने सुरक्षा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.
या पार्श्वभूमीवर वेताळ नगर समाजमंदिर समोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अत्यावश्यक असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे. चोरी, छेडछाड तसेच इतर अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.दरम्यान, नगराध्यक्षांनी या मागणीची दखल घेऊन आपल्या स्तरावर तात्काळ प्रयत्न करावेत, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे. शहर व विशेषतः प्रभाग क्रमांक आठच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

0
7
6
4
9
7



