Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

यात्रा मैदानावर अतिक्रमणाचा आरोप; ३९ कोटींच्या नुकसान प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रमक निवेदन

१५ दिवसांत निर्णय नाही तर उच्च न्यायालयात जाणार - अर्जदारांचा इशारा

0 7 6 4 8 6

यात्रा मैदानावर अतिक्रमणाचा आरोप; ३९ कोटींच्या नुकसान प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रमक निवेदन

तुळजापूर : तुळजापूर शहरातील
येथील सर्व्हे नं. १३८/१ (नगर भूमापन क्र. ३८५३) मधील शासनाच्या मालकीची तब्बल २ हेक्टर ६३ आर जमीन क्षेत्रावर बेकायदेशीर कब्जा करून उभारलेली बांधकामे, गाळे व पत्र्याचे शेड तात्काळ पाडून जमीन पोलीस संरक्षणात ताब्यात घ्यावी, तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम व आक्रमक मागणी किरण यादव व रमेश कदम यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी धाराशिव यांच्याकडे केली आहे. या प्रकरणामुळे ‘यात्रा मैदान’ वाद पुन्हा एकदा पेटला आहे.अर्जात गैरअर्जदार क्रमांक १ ते २८ यांनी संगनमताने, कपटनीतीने शासनजमिनीवर बलादगृहन (extortion) करून खोटे व बनावट दस्तऐवज तयार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या बेकायदेशीर कृत्यांमुळे शासनाचे सुमारे ३९ कोटी रुपयांचे महसुली नुकसान झाल्याचा दावा करत ही रक्कम दोषींकडून वसूल करण्याची, त्यांच्या स्थावर-जंगम मालमत्तेवर जप्ती आणण्याची व बँक खाती गोठविण्याची मागणीही करण्यात आली आहे.या प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार तुळजापूर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने सखोल चौकशी करून अहवाल दिला असून तो अहवाल अर्जदारांच्या बाजूने असल्याचे सांगितले जाते. दोन्ही पक्षांना सुनावणीची संधी देऊन, पुरावे तपासून समितीने स्पष्ट निष्कर्ष नोंदविल्यानंतरही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अर्जदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही निर्णय होत नसल्याचा आरोप केला आहे. केवळ १५ दिवसांत कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल,असा इशाराही अर्जात देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित खरेदीखते रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालयात विशेष दावा दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
यात्रा मैदानाच्या नावाखाली शासनजमिनीवर सुरू असलेली ही कथित लूट थांबवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलावीत, अन्यथा जनतेचा रोष उफाळून येईल, असा इशारा देत अर्जदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण तुळजापूरचे लक्ष लागले आहे.या निवेदनावर किरण माणिकराव यादव आणि रमेश रंगनाथ कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे