ब्रेकिंगमहाराष्ट्र
काक्रंबा गटात भाजपचा प्रचार शिगेला; दयानंद शिंदे व किसन देढे यांच्या प्रचारसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
युवा नेते विशाल छत्रे - नगरसेवक मधुकर शेळके यांच्या जोरदार उपस्थितीने भाजप प्रचाराला नवी ऊर्जा

0
7
6
4
8
6
काक्रंबा गटात भाजपचा प्रचार शिगेला; दयानंद शिंदे व किसन देढे यांच्या प्रचारसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
युवा नेते विशाल छत्रे – नगरसेवक मधुकर शेळके यांच्या जोरदार उपस्थितीने भाजप प्रचाराला नवी ऊर्जा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा जिल्हा परिषद गटात भाजपने प्रचाराचा वेग वाढवला असून उमेदवार दयानंद मनोहर शिंदे व पंचायत समिती गणातील उमेदवार किसन बंडू देढे यांच्या प्रचारासाठी काक्रंबा येथे भव्य प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेला तुळजापूर नगर परिषदेचे नगरसेवक मधुकर शेळके, युवा नेते विशाल छत्रे, अशोक देवगुंडे, उमेश खांडेकर, नितीन पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काक्रंबा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी भाजप सरकारने केंद्र व राज्यात राबवलेल्या विविध विकास योजनांची माहिती देत, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजपचे उमेदवार विजयी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. दयानंद शिंदे व किसन देढे यांनीही मतदारांशी संवाद साधत, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.प्रचारसभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता काक्रंबा गटात भाजपच्या विजयाचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला. “विकासासाठी भाजपलाच मतदान” असा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. प्रचाराच्या या जोरदार फेरीमुळे काक्रंबा गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपची ताकद अधिक भक्कम होताना दिसत आहे.
0
7
6
4
8
6



