ब्रेकिंगमहाराष्ट्र
राज्यातील १२ जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; आता ७ फेब्रुवारीला होणार मतदान !
मतदान व मतमोजणीची तारीख बदलली; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पुढे

0
7
6
4
8
6
मतदान व मतमोजणीची तारीख बदलली; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पुढे
मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकांच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने सुधारित आदेश जारी करत मतदान ७ फेब्रुवारी तर मतमोजणी ९ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची घोषणा केली आहे. यापूर्वी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया पार पडणार होती; मात्र अपरिहार्य कारणांमुळे निवडणूक टप्पे पुढे ढकलण्यात आले आहेत.सर्वोच्च न्यायालयाने १२ जानेवारी २०२६ रोजी राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ जानेवारीनंतर दोन आठवड्यांची मुदत दिली होती.

त्या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात होती. मात्र २८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात २८ ते ३० जानेवारीदरम्यान राज्यस्तरीय दुखवटा जाहीर करण्यात आला.या दुखवटा कालावधीत उमेदवारांना प्रचार करणे तसेच निवडणूक प्रक्रियेतील इतर टप्पे पार पाडणे व्यवहार्य ठरणार नसल्याने मतदान व मतमोजणीसह संपूर्ण निवडणूक कार्यक्रमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच उमेदवारांना समान संधी मिळावी, या उद्देशाने आयोगाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता निवडणूक प्रक्रिया ७ व ९ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.
0
7
6
4
8
6



