Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

गोवंशीय मांसाची अवैधरित्या वाहतूक; वाशी पोलिसांकडून एकावर गुन्हा दाखल!

गोवंशीय मांसाची अवैधरित्या वाहतूक; वाशी पोलिसांकडून एकावर गुन्हा दाखल!

0 7 6 4 8 6

गोवंशीय मांसाची अवैधरित्या वाहतूक; वाशी पोलिसांकडून एकावर गुन्हा दाखल!

वाशी : प्रतिनिधी

गोवंशीय जनावरांची निर्दयपणे कत्तल करून त्यांचे मांस व हाडे विक्रीसाठी वाहतूक केल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमिर महेबुब शेख (वय 26, रा. काटगाव ता. तुळजापूर, जि. धाराशिव) हा दि. 5 ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास लोणखस शिवार, एनएच-52 रस्त्यावर आयशर वाहन (क्र. MH-13-EX-4898) मध्ये 6 टन गोवंशीय मांस आणि हाडे, एकूण 6 लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन जात असताना वाशी पोलिसांना संशय आला. तपासादरम्यान अवैधरीत्या वाहतूक केल्याचे उघडकीस आले. या कारवाईत वाहनासह एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीवर प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(क), 9(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास वाशी पोलीस करीत आहेत.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे