ब्रेकिंगमहाराष्ट्र
मंगरूळ परिसरात पोलिसांची कारवाई; कचरू सकट तीन जिल्ह्यांतून दोन दोन वर्षासाठी हद्दपार – सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप
मंगरूळ परिसरात पोलिसांची कारवाई; कचरू सकट तीन जिल्ह्यांतून दोन दोन वर्षासाठी हद्दपार - सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप

0
7
6
4
9
7
मंगरूळ परिसरात पोलिसांची कारवाई; कचरू सकट तीन जिल्ह्यांतून दोन दोन वर्षासाठी हद्दपार – सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप
तुळजापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटकडून निवडणूक लढवलेले कचरू मल्हारी सकट यांना धाराशिव,सोलापूर व लातूर या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आल्याचा आरोप लहुजी शक्ती सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष यांनी केला आहे. दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी शासकीय विश्रामगृह,तुळजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सोलापूर जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटोळे यांनी ही माहिती दिली.

मातंग समाजाने निवडणुकीत दिलेल्या भरघोस पाठिंब्याबद्दल आभार मानण्यासाठी कचरू सकट मंगरूळ परिसरातून तुळजापूरकडे येत असताना पोलिसांनी त्यांना अडवले. तुमच्यावर हद्दपारची नोटीस आहे.तुम्ही तुळजापूरमध्ये प्रवेश करू शकत नाही,असे सांगत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून इंदापूरच्या पलीकडे सोडल्याचा दावा पाटोळे यांनी केला.
यापूर्वी दि.१६ जानेवारी २०२६ रोजी काढलेली हद्दपार नोटीस जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून रद्द करण्यात आली होती. मात्र २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा तीन जिल्ह्यांतून हद्दपारीचा आदेश बजावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. दि.२५ फेब्रुवारीपासून पुढील दोन वर्षांसाठी ही कारवाई लागू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हद्दपार केल्यानंतर त्यांच्या जीवाला धोका असून तो सत्ताधाऱ्यांकडूनच होऊ शकतो असा गंभीर आरोप पाटोळे यांनी केला. यावेळी व्यासपीठावर सुरेश भिसे, अनिल सकट यांच्यासह दीड-दोनशे कार्यकर्ते उपस्थित होते. या घडामोडीमुळे तुळजापूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
0
7
6
4
9
7




