Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे; २३ फेब्रुवारीला शेतरस्ता खुला करण्याचे प्रशासनाचे आदेश

लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे; २३ फेब्रुवारीला शेतरस्ता खुला करण्याचे प्रशासनाचे आदेश

0 7 6 5 0 5

तुळजापूर : तालुक्यातील मौजे भातंब्री येथील गट क्रमांक ५३/५५ कडे जाणारा शेतरस्ता गेल्या २०२३ पासून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असूनही खुला न केल्याने संतप्त झालेल्या शेतकरी शिवाजी गोरोबा दांगट यांनी दि.१६ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाने तातडीने दखल घेत लेखी नोटीस बजावत रस्ता खुला करण्यासाठी दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ ही तारीख निश्चित केली आहे.या संदर्भात तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी अरविंद बोळंगे यांनी दांगट यांना पत्र देत, उपोषण मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. संबंधित प्रकरणात जमाबंदी-२ विभागाकडूनही आवश्यक ती कारवाई सुरू करण्यात आल्याचे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता न मिळाल्याने शेती क्षेत्र पडिक राहिल्याचा आरोप दांगट यांनी केला होता. अखेर प्रशासनाने ठोस तारीख जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, आता २३ फेब्रुवारीला प्रत्यक्षात रस्ता खुला होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे