Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

येडशी येथे दुचाकी चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

येडशी येथे दुचाकी चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

0 6 7 8 4 1

धाराशिव : येडशी येथील सम्राट चौक परिसरात किराणा दुकानासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.फिर्यादी बालाजी बबन भोसले (वय २९, रा. सांजा रोड, रामनगर, धाराशिव, ता. जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची सुमारे ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल (क्र. एमएच २५ ए.एफ. ०९३५) ही दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास येडशी येथील सम्राट चौकात कोरे किराणा दुकानासमोर उभी असताना अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.या घटनेबाबत भोसले यांनी दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रथम खबरी अहवाल दिल्यानंतर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०२(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे