ब्रेकिंगमहाराष्ट्र
अवैध गुटखा विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल; ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
7
6
5
0
6
धाराशिव : राज्यात शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री व वाहतूक रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने धडक कारवाई सुरू ठेवली असून, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने सोमवारी (दि. ९) दुपारी एनएच-५२ मार्गावर मोठी कारवाई केली. या कारवाईत अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुमारे ५५ हजार ५६६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आफताफ नुर महंमद तांबोळी (रा. कसबे तडवळा, ता. व जि. धाराशिव) हा आळणी पाटीकडून येडशीकडे जाणाऱ्या एनएच-५२ रस्त्यालगत संशयास्पदरीत्या मोटरसायकलवरून जात असल्याची माहिती धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दुपारी १.०५ वाजण्याच्या सुमारास त्यास ताब्यात घेतले.तपासादरम्यान आरोपीकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले विविध प्रकारचे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. यामध्ये विमल पान मसाला, व्ही-१ तंबाखू, राजनिवास सुगंधी पान मसाला, बादशाह पाउच, शॉट तंबाखू, झेडएन-१ जाफरानी जर्दा, जाफरानी जर्दा पाउच, चॉकटी, डायरेक्टर स्पेशल पान मसाला, प्रिमियम क्वालिटी एक्स्ट्रा फेशनस आदी पदार्थांचा समावेश आहे. तसेच आरोपीची मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे. एकूण जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे ५५ हजार ५६६ रुपये इतकी आहे.या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४, २७५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात पुढेही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
0
7
6
5
0
6



