ब्रेकिंगमहाराष्ट्र
ड्रग्सच्या विळख्यातून युवांना वाचवण्यासाठी पोलिसांचा एल्गार; यशश्री क्लासमध्ये जनजागृती अभियान
ड्रग्सच्या विळख्यातून युवांना वाचवण्यासाठी पोलिसांचा एल्गार; यशश्री क्लासमध्ये जनजागृती अभियान

0
7
6
4
8
6
ड्रग्सच्या विळख्यातून युवांना वाचवण्यासाठी पोलिसांचा एल्गार; यशश्री क्लासमध्ये जनजागृती अभियान
तुळजापूर : वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यात अडकणाऱ्या युवा पिढीला वाचवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने धाराशिव येथे जनजागृती अभियान राबवले. दि. २२ मे २०२६ रोजी यशश्री क्लास येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गांजा, अफू, ड्रग्स यांसारख्या घातक व्यसनांपासून दूर राहण्याचे कडक आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवा वर्ग आणि प्रशिक्षक उपस्थित होते. “ड्रग्स हा तरुणाईला पोखरणारा अदृश्य शत्रू असून, एकदा व्यसनाधीन झाल्यानंतर आयुष्य उद्ध्वस्त होते,” असा इशारा अधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
डीवायएसपी साईनाथ ठोंबरे आणि पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रदीप ठाकूर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, शैला टेळे, नागेश केंद्रे आणि निलेश सरपाळे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून दिले.दरम्यान, युवकांनी शिक्षण, करिअर आणि कुटुंबासाठी व्यसनमुक्त राहणे काळाची गरज असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला.
0
7
6
4
8
6