Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मंदिर चौकी पोलिसांचा चपळ कारभार;मोबाईल चोरावर वज्र झडप!

मंदिर चौकी पोलिसांचा चपळ कारभार;मोबाईल चोरावर वज्र झडप!

0 7 6 5 0 5

मंदिर चौकी पोलिसांचा चपळ कारभार;मोबाईल चोरावर वज्र झडप!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर शहरातील गणपती मंदिर परिसरात चोरीस गेलेला मोबाईल अवघ्या काही तासांत शोधून काढत मंदिर सुरक्षा चौकी पोलिसांनी तत्परता दाखवली.

दिनांक १७ ऑक्टोबर रोजी तक्रारदार सुसेन मुळे (रा. लातूर) यांनी मंदिर सुरक्षा चौकीत येऊन तक्रार दिली की, त्यांचा ओपो कंपनीचा मोबाईल गणपती मंदिरासमोरून चोरीला गेला होता

तक्रार मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर यांनी तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे द्वारेतपासणी सुरू केली. तपासात एका लहान मुलाने मोबाईल चोरतानाचा स्पष्ट व्हिडिओ दिसून आला.

चौधर यांनी विलंब न करता दोन पोलीस अंमलदारांना सिव्हिल ड्रेसमध्ये सोबत घेऊन परिसरात शोधमोहीम सुरू केली. काही मिनिटांतच संशयित आरोपी मंदिर परिसरात होम कट्टा समोर आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने आपले नाव दीपक शिवाजी काळे (वय 15 वर्षे, रा. पात्रुड पार्टी फाटा, भूम) असे सांगितले.

विचारपूस दरम्यान त्याने मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली, तसेच त्याच्याकडून सदर मोबाईल हस्तगत करण्यात आला. मोबाईल तक्रारदारास दाखविल्यानंतर तो त्यांचाच असल्याची खात्री पटली.

यानंतर तक्रारदार, विधी संघर्षग्रस्त बालक व मुद्देमाल (मोबाईल) यांना तुळजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून, बालकाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्पर व संवेदनशील पोलिसप्रशासनामुळे मंदिर परिसरातील नागरिक
सहाय्यक पोलीस निरीक्षक
मंदिर सुरक्षा चौकी,अर्जुन चौधर आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे