Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

खाद्यात विष मिसळून गायी ठार; तुळजापुरात खोडसाळ प्रकार उघड

खाद्यात विष मिसळून गायी ठार; तुळजापुरात खोडसाळ प्रकार उघड

0 7 6 4 8 7

खाद्यात विष मिसळून गायी ठार; तुळजापुरात खोडसाळ प्रकार उघड

तुळजापूर : प्राण्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने खाद्यामध्ये विषारी औषध मिसळल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- विजय उमराव शेलार, वय ४१ वर्षे, रा. होनाळा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे बारुळ शिवारातील शेत गट नं १६/२ मध्ये अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणे नुकसान व प्राण्यांना ठार मारण्याचे उद्देशाने शेडमधील नेचर डिलाईट कंपनीचे मका भरडा व सुगरास पोत्यामधील खाद्यामध्ये कोणते तरी विषारी औषध मिसळले असुन ते खाद्य दुध देणाऱ्या सात गाईना खाण्यास दिले असता सदर सात गाईना विषबाधा होवून त्यामधील तिन गाई मयत झाल्या. उर्वरीत गाई या पशु वैद्यकीय अधिकारी यांचे करवी उपचार घेत आहेत.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विजय शेलार यांनी दि.३०.०३.२०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे तुळजापूर येथे भा.न्या.सं. कलम ३२५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे