“महंतांच्या हस्ते अंबाबाईचा जोगवा मागून नवरात्रोत्सवाची सांगता;भक्तिमय वातावरणात तुळभवानी मातेचे मंदिर न्हाऊन निघाले”
“महंतांच्या हस्ते अंबाबाईचा जोगवा मागून नवरात्रोत्सवाची सांगता;भक्तिमय वातावरणात तुळभवानी मातेचे मंदिर न्हाऊन निघाले”
“महंतांच्या हस्ते अंबाबाईचा जोगवा मागून नवरात्रोत्सवाची सांगता;भक्तिमय वातावरणात तुळभवानी मातेचे मंदिर न्हाऊन निघाले”
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ मानली जाणारी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाचा समारोप मंगळवारी भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. महंत वाकोजी बुवा व गुरु तुकोजी बुवा यांच्या हस्ते अंबाबाईचा जोगवा मागून महोत्सवाची सांगता करण्यात आली.

‘उदो उदो अंबाबाईचा जोगा’ अशा जयघोषांनी संपूर्ण तुळजाभवानीचे मंदिर दुमदुमून गेली. महंतांच्या उपस्थितीत पारंपरिक विधी,आरती आणि मंत्रोच्चारात जोगवा मागण्याचा सोहळा पार पडला.भाविकांनी मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने देवीचे दर्शन घेत ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर भारावून गेला.

या प्रसंगी प्रक्षाळ मंडळ अध्यक्ष विशाल रोचकरी,बाबासाहेब खपले,अनंत सावंत,उमाकांत रणदिवे,विशाल वाघमारे,सारंग क्षिरसागर,रत्नदिप मगर,तसेच अन्य सेवेकरी व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात दररोज आरत्या, अभिषेक, देवीभोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी तुळजापूर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली होती. महोत्सवाच्या सांगतेनंतर भाविकांनी देवीकडे आपापले नवस फेडत, समाधानी मनाने जोगवा मागून ‘अंबाबाईचा उदो’ करत परतीचा रस्ता धरला. नवरात्र महोत्सवाची सांगता झाली असली तरी ‘अंबाबाईचा जयजयकार’ अजूनही भक्तांच्या ओठांवर गुंजत राहिला. देवीभक्तांनी एकमुखाने उच्चारले “उदो उदो अंबाबाईचा जोगा…



