Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

अवैध गोवंशीय मांस वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अवैध गोवंशीय मांस वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0 7 6 4 8 6

अवैध गोवंशीय मांस वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

धाराशिव – प्रतिनिधी

धाराशिव शहरातील वैराग रोड परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध गोवंशीय मांसाची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करत सुमारे ८.५२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ५ वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव शहर पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वैराग रोडवर पांढऱ्या रंगाच्या पिकअप (एमएच २५ एजे ६४९५) मध्ये गोवंशीय मांसाची वाहतूक होत आहे.

यानंतर पथकाने तत्काळ नमूद ठिकाणी छापा टाकला असता, सदर पिकअप वाहनात अंदाजे १,७६० किलो गोवंशीय जातीच्या जनावरांचे मांस आढळून आले. पथकाने सुमारे ३ लाख ५२ हजार रुपयांचे मांस आणि ५ लाख रुपयांचे पिकअप वाहन असा एकूण ८ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरून गुन्हा नोंदवला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोलीस हवालदार समाधान वाघमारे, दयानंद गादेकर, चालक पोलीस अमंलदार दहिहंडे, तसेच धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आडगळे व पोलीस अमंलदार मामिलवाड यांच्या पथकाने केली.स्थानिक गुन्हे शाखेच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध गोमांस वाहतुकीवर चांगलाच आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे.

1/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे