ब्रेकिंगमहाराष्ट्र
सुरेश बिराजदार यांना विधान परिषदेत संधी द्यावी; कार्यकर्त्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी
सुरेश बिराजदार यांना विधान परिषदेत संधी द्यावी; कार्यकर्त्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी

0
7
6
4
9
6
सुरेश बिराजदार यांना विधान परिषदेत संधी द्यावी; कार्यकर्त्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व प्राध्यापक सुरेश दाजी बिराजदार यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांच्याकडे केली आहे.
गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठ राहून पक्षवाढसाठी कार्य करणारे सुरेश बिराजदार यांनी सहकार, शिक्षण व बँकिंग क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. साखर कारखाने, शिक्षण संस्था तसेच विविध सहकारी संस्थांमधील त्यांच्या अनुभवाचा पक्षाला मोठा लाभ झाल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले आहे.
धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना बळकट करण्यासाठी बिराजदार यांनी अहोरात्र परिश्रम घेतले असून, प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद ठेवत त्यांनी पक्षात एकजूट निर्माण केली आहे. त्यांच्या स्वच्छ प्रतिमा, सुसंस्कृत व मनमिळावू स्वभावामुळे ते कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असल्याचेही सांगण्यात आले.दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान अजित पवार यांनी धाराशिव येथील जाहीर सभेत सुरेश बिराजदार यांना लवकरच विधिमंडळात संधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे “अजितदादांचा शब्द पाळावा” अशी भावनिक मागणीही कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.सुरेश बिराजदार यांना विधान परिषदेत संधी दिल्यास धाराशिव जिल्ह्यात पक्षाच्या वाढीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.
0
7
6
4
9
6



