ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
कितीही किचड फेका… कमळच फुलते!’ – पिटू गंगणे यांच्या नेतृत्वाचा करिष्मा; विरोधकांना जबर धक्का उमेदवार आकाश शिंदेसह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात केला प्रवेश
कितीही किचड फेका… कमळच फुलते!’ - पिटू गंगणे यांच्या नेतृत्वाचा करिष्मा; विरोधकांना जबर धक्का उमेदवार आकाश शिंदेसह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात केला प्रवेश
0
6
7
8
4
1
कितीही किचड फेका… कमळच फुलते!’ – पिटू गंगणे यांच्या नेतृत्वाचा करिष्मा; विरोधकांना जबर धक्का
उमेदवार आकाश शिंदेसह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात केला प्रवेश !
तुळजापूर : प्रतिनिधी
“कोणी कितीही चिखलफेक केली तरी किचड मै कमळ फुलता है” – या शब्दांना अक्षरशः मूर्त रूप देत तुळजापूरच्या राजकारणात आज मोठी राजकीय हलचाल पाहायला मिळाली. भावी नगराध्यक्ष विनोद उर्फे पिटू गंगणे यांच्या नेतृत्वावरचा ठसा पुन्हा एकदा ठळक झाला आहे.

तुतारी चिन्हाचे उमेदवार आकाश शिंदे व युवा उद्योजक समाधान सिरसट यांनी गंगणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. व्यासपीठावर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी माजी गट नेते संतोष परमेश्वर,शांताराम पंदे, तालुकाध्यक्ष आनंद कंदले, माऊली भोसले, शहाजी जाधव, पै. पंकज पाटील, आप्पा गंगणे, चेतन शिंदे, विशाल छत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला दिला मोठा धक्का
आकाश शिंदे यांनी उमेदवारी माघारी घेत केली भाजपात एन्ट्री आमदार राणाजगजितसिंह पाटील व विनोद गंगणे यांच्यावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला दि.२१ नोव्हेंबर रोजी धक्का बसला. त्यांच्या नगरपरिषद निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांपैकी आकाश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेत भाजपा प्रवेशाची घोषणा केली.
गंगणे यांच्या नेतृत्वाची वाढती ताकद व कार्यकर्त्यांशी असलेले नाते यामुळेच हा निर्णय केल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

इंटक काँग्रेसलाही फटके – जिल्हाध्यक्षही भाजपात
स्थानीक कुरघोडी राजकारणाला कंटाळून राष्ट्रीय इंटक काँग्रेस पक्षाचे धाराशिव तथा उपेदवार जिल्हाध्यक्ष मधुकर बबनराव शेळके यांनीही भाजपात प्रवेश केला. प्रभाग क्रमांक ३ मधून उमेदवार असलेल्या शेळके यांनी गंगणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

“पोरकाझालो… पण राणा दादा आहेत सोबत!” – विनोद गंगणे
भावी नगराध्यक्ष विनोद उर्फे पिटू गंगणे यांनी भावनिक शब्दांत म्हटले -“माझा उजवा हात माझे मित्र कै. नारायणराजे गवळी आज जवळ नाही, म्हणून पोरकाझालो… पण शहराची सात आणि आमदार राणा दादांची पाठीवरची थाप आहे. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत २३ उमेदवारांसह नगराध्यक्षपदाचा विजय निश्चीत आहे.
त्यांचे हे वक्तव्य कार्यकर्त्यांच्या टाळ्यांच्या गजरात दुमदुमले.
तुळजापूरमध्ये भाजपाची ताकद दुप्पट विरोधकांची झाक उतरण्यात पिटू गंगणे पुन्हा यशस्वी आजच्या राजकीय घडामोडींनी तुळजापूरमध्ये भाजपाची ताकद दुपटीने वाढल्याची भावना कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे. गंगणे यांच्या नेतृत्वावरचा विश्वास आणि विकासाच्या राजकारणाला मिळत असलेला प्रतिसाद यामुळे विरोधकांची झाक अक्षरशः उतरल्याचे चित्र दिसत आहे.यावेळी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0
6
7
8
4
1



