Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

विनोद गंगणेवर आरोपांचा मारा; पण तुळजापूरात जनतेचा ठाम विश्वास कायम!करुणा मुंडेंच्या टीकेला समर्थकांचा प्रत्युत्तर– “विकास रोखणाऱ्यांची तणतण!”

करुणा मुंडेंच्या टीकेला समर्थकांचा प्रत्युत्तर– “विकास रोखणाऱ्यांची तणतण!”

0 6 7 8 4 1

विनोद गंगणेवर आरोपांचा मारा; पण तुळजापूरात जनतेचा ठाम विश्वास कायम!

करुणा मुंडेंच्या टीकेला समर्थकांचा प्रत्युत्तर– “विकास रोखणाऱ्यांची तणतण!”

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूरच्या राजकारणात गुरुवारी अचानक जोरदार राजकीय गरम वातावरण निर्माण झाले. स्वराज्य शक्ती सेनेच्या करुणा मुंडे यांनी काही आरोपांची माळ लावत विनोह पिटू गंगणे यांच्यावर टीका केली. मात्र तुळजापूरकरांनी या आरोपांना फारसे गांभीर्याने न घेत सरळ संदेश दिला – “विकास करणाऱ्यांवरच बोट उठतात!”

करुणा मुंडे यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळ हलले. पण त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसून, विरोधकांनी जनतेत मिळणारा गंगणे यांच्या समर्थनाचा वाढता ओघ पाहून निर्माण केलेली राजकीय भीतीच दिसून आल्याची चर्चा शहरात रंगली.

भाजपाची उमेदवारी म्हणजे गुन्हेगारीला पाठबळ?
या आरोपांवर स्थानिक नागरिक आणि समर्थकांनी कडाडून प्रतिक्रिया दिली.“गंगणे यांच्या नावावर विकासाची ठोस कामे आहेत, लोकांच्या पाठीशी उभा राहणारा माणूस आहे. त्याच्यावर आरोप करणारे आजवर तुळजापूरसाठी काय केले?” असा सवाल जनतेतून करण्यात आला.

ड्रग्ज माफियाचा आरोप फोल?
स्थानिक पातळीवर या आरोपांना दुजोरा देणारा एकही पुरावा नसल्याने, राजकारणात मुद्दाम गंगणे यांच्या प्रतिमेला डाग लावण्याचा प्रयत्न म्हणूनच हे पाहिले जात आहे. तुळजापूरमधील तरुणांनीही प्रतिक्रिया दिली –
“ज्यांनी कधी तुळजापूरच्या समस्या पाहिल्याच नाहीत, ते आता उपदेश करायला मैदानात उतरले. गंगणे यांच्यावर डाग लावण्याचा प्रयत्न हा निवडणुकीपूर्वीचा ठरलेला डाव आहे.”

भेसळ दारू, गुन्हेगारी… आरोपांची यादी मात्र जुनीच
गंगणे यांचा प्रतिसाद नसतानाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगितले की -“भेसळ दारूविरुद्ध सर्वात आधी मोहीम उभारली ती गंगणे यांनी. आज त्यांच्याच कामाचा श्रेय उचलण्यासाठी काही जण आरोपांची नाट्ये रचत आहेत.”

करुणा मुंडे मैदानात उतरल्याने विरोधकांना एनर्जी?
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की “तुळजापूरात गंगणे यांच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे ‘आता तरी काहीतरी बोललं पाहिजे’ या दबावातूनच हे वक्तव्य जन्माला आलं असावं.”

 

तुळजापूरच्या जनतेचा स्पष्ट संदेश
शहरात सर्वत्र चर्चा सुरू आहे—
“काम केलेला नेता कोण? संकटात मदत करणारा कोण? रॅलीत तुडुंब गर्दी कुणाच्या मागे दिसते? उत्तर एकच – विनोद उर्फ पिटू गंगणे!”

विरोधकांचे आरोप हवेत उडून जात असताना, गंगणे यांच्या प्रचाराला आणखी गती मिळाल्याचे चित्र तुळजापूरमध्ये दिसत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे