Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर पोलीस ठाण्यातील निष्काळजीपणा उघड- सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे निलंबित !

९० दिवसांत चार्जशीट न दिल्याची शिक्षा

0 7 6 5 0 7

तुळजापूर पोलीस ठाण्यातील निष्काळजीपणा उघड- सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे निलंबित !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार तुळजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कचरु नरवडे यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे तुळजापूर येथे दाखल गुन्हा गु.र.नं. 93/2025 कलम 103(1), 3(5) भा.न्या.सं. अन्वये असलेल्या प्रकरणात निर्धारित ९० दिवसांच्या कालावधीत चार्जशीट सादर करण्यात निष्काळजीपणा झाल्याचे आढळून आले.

या प्रकरणात कर्तव्यात गंभीर दुर्लक्ष आणि जबाबदारीतील हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर वरिष्ठांनी कठोर भूमिका घेतली आहे. परिणामी, संबंधित अधिकाऱ्याला निलंबनाची कारवाई करण्यात आली.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले की,

◾“पोलीस दलात जबाबदारी आणि शिस्त यांना सर्वोच्च स्थान आहे.कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही.”

या कारवाईमुळे पोलीस विभागात शिस्त आणि जबाबदारीबाबतचा संदेश स्पष्टपणे गेला आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे