तुळजापूरात नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे भाविकांना दुर्गंधीचा त्रास; तातडीच्या कारवाईची मागणी – सामाजिक कार्यकर्ते चिन्मय मगर
तुळजापूर : चैत्र पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना, नगरपालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे भाविकांनसह स्थानिक नागरिकांना गंभीर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. भवानी रोडवरील सोनेश्वर गणेश मंदिराच्या पाठीमागे असलेले नगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय सध्या अत्यंत अस्वच्छ अवस्थेत असून, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या मार्गावरून दररोज हजारो भाविकांचे ये-जा सुरू असते. मात्र, शौचालयाची नियमित साफसफाई होत नसल्याने व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लागल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे भाविकांना नाक दाबून या मार्गाने जावे लागत असून, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.नगरपालिकेकडून स्वच्छतेबाबत मोठे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णतः विपरीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून तुळजापूरची ओळख असताना, अशा प्रकारची अस्वच्छता शहराच्या प्रतिमेला धक्का देणारी ठरत आहे.
दरम्यान, या समस्येबाबत स्थानिक नागरिकांसह चिन्मय मगर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, भाविकांकडूनही तात्काळ उपाययोजनांची मागणी होत आहे. नगरपालिकेचे शौच्छालयाचे बांधकाम पूर्ण होऊन पाच वर्षे झाले तरीही स्वच्छालय कुलूप बंद अवस्थेत आहे आणि शौचालयाच्या परिसरातील नियमित स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि दुर्गंधी नियंत्रणासाठी नगरपालिकेने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही चिन्मय मगर यांनी दिला आहे.
दुष्काळाच्या काळोखात शेतकऱ्यांच्या घरात दिवाळीचा प्रकाश! पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने धाराशिव मधील दोन लाख कुटुंबांना दिवाळी शिधा वाटप
3 days ago
उजनी धरणाच्या रक्षणासाठी नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा एल्गार!
3 days ago
बलात्कार व ॲट्रॉसिटीच्या गंभीर गुन्ह्यात माजी सैनिकाला १० दिवसांत जामीन! धाराशिव विशेष न्यायालयाचा आदेश; ॲड. एम. बी. माढेकर यांच्या युक्तिवादात मांडले महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे!
3 days ago
कष्टकरी भटक्या कुटुंबांसोबत वाढदिवस आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद; १०० कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप
3 days ago
तुळजापुरात भरधाव कारचा काळ! जुन्या बसस्थानकाजवळ पादचाऱ्याला जोरदार धडक; ४० वर्षीय अहमद अन्सारी यांचा मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल!
4 days ago
विकासाचा ध्यास, जनतेशी नाळ आणि तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्राला नवी ओळख! माजी मंत्री तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विकासपर्वाचा घेतलेला वेध; मंदिर विकासापासून रेल्वे प्रकल्पापर्यंत धाराशिवच्या विकासाला गती देण्याचे आव्हान!
4 days ago
सात वर्षांपूर्वी हुकलेली उमेदवारी, आता विधान परिषदेचा विजय! डॉ. प्रतापसिंह पाटील यांची सतीश चव्हाण यांच्यावर मात; राजकीय प्रवासाला नवे वळण
4 days ago
दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार! आत्महत्येचा विचार करण्यापूर्वी शिवसेनेच्या समितीशी संपर्क साधा; शेतकऱ्यांच्या समस्या २४ तासांत सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार – आमदार डॉ. तानाजीराव सावंत
4 days ago
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट; दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा!
5 days ago
दुष्काळात चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक करणाऱ्यांना प्रशासनाचा दणका!