Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

अवैध अफू लागवडीवर लगाम; धाराशिव एलसीबीची धडक कारवाई वाशी तालुक्यात ७२ लाख ८४ हजारांची अफूची झाडे जप्त, शेतकऱ्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा

अवैध अफू लागवडीवर लगाम; धाराशिव एलसीबीची धडक कारवाई वाशी तालुक्यात ७२ लाख ८४ हजारांची अफूची झाडे जप्त, शेतकऱ्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा

0 7 6 4 8 6

अवैध अफू लागवडीवर लगाम; धाराशिव एलसीबीची धडक कारवाई वाशी तालुक्यात ७२ लाख ८४ हजारांची अफूची झाडे जप्त, शेतकऱ्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा

धाराशिव : अवैध अमली पदार्थांच्या लागवडीवर कडक कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांनी वाशी तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. मौजे दशमेगाव शिवारात एका शेतकऱ्याने कांद्याच्या आंतरपिकात लपूनछपून अफूची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत तब्बल ४८५.६५ किलो वजनाची, अंदाजे ७२ लाख ८४ हजार ७५० रुपये किमतीची अफूची झाडे जप्त केली आहेत.
दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व पथकाने सर्वे क्र. १६३, मौजे दशमेगाव येथे पाहणी केली. तेथे कांद्याच्या पिकात मोठ्या प्रमाणावर पांढऱ्या व गुलाबी रंगाची फुले आणि मोठ्या बोंडांनी युक्त अफूची झाडे आढळून आली.
सदर शेत हे समाधान मनोहर उघडे (रा. दशमेगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) यांचे असून त्यांनीच ही अवैध लागवड केल्याचे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सांगितले. नायब तहसीलदार किसन सांगळे व दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत ही अफूची झाडे जप्त करण्यात आली.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे वाशी येथे गु.र.नं. ४५/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८(क) व १८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. अवैध अमली पदार्थांच्या मुळावर घाव घालणारी ही कारवाई ठरली आहे.

4/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे