शारदीय नवरात्र महोत्सवात श्री.तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या देणगीत घट;मागील वर्षाच्या तुलनेत ३४.४७ लाखांची घट
शारदीय नवरात्र महोत्सवात श्री.तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या देणगीत घट;मागील वर्षाच्या तुलनेत ३४.४७ लाखांची घट
शारदीय नवरात्र महोत्सवात श्री.तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या देणगीत घट;मागील वर्षाच्या तुलनेत ३४.४७ लाखांची घट
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, तुळजापूर यांच्या देणगी उत्पन्नात यंदाच्या शारदीय नवरात्र महोत्सवात घट झाल्याचे समोर आले आहे. ट्रस्टच्या नोंदीप्रमाणे, २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२५ या १७ दिवसांच्या कालावधीत एकूण रु ५.६६ कोटी इतकी देणगी जमा झाली असून, मागील वर्षी म्हणजेच ३ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०२४ या १५ दिवसांत रु ६.०१ कोटी देणगी मिळाली होती. त्यामुळे यंदा तब्बल रू ३४.४७ लाखांची घट नोंदली गेली आहे.

देणगींच्या प्रकारानुसार पाहता ‘दिनगी दर्शन (कॅश)’ या प्रमुख स्त्रोतांतून यंदा रु.२५.२१ लाख मिळाले असून, ते मागील वर्षाच्या तुलनेत रु.८.१० लाखांनी कमी आहेत. ‘दानपैती’तही रू २१.८६ लाखांची घट झाली आहे. मात्र ‘गुप्तदान पैती’ आणि ‘ऑनलाइन युपीआय देणगी’ यांत थोडी वाढ दिसून आली आहे.विशेष म्हणजे, ऑनलाइन माध्यमांतून देणगी देणाऱ्यांची संख्या वाढत आहे, परंतु पारंपरिक कॅश व दानपेटी देणग्यांमध्ये घट झाल्याचे ट्रस्टच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.शारदीय नवरात्र महोत्सव काळात दरवर्षी लाखो भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतात. मात्र यंदा काही दिवस पावसाचे प्रमाण आणि वाहतूक अडचणींमुळे भाविकांची उपस्थिती थोडी कमी असल्याची माहिती विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली.
देणगी उत्पन्न घटले असले तरीही भाविकांची श्रद्धा कायम असून, ट्रस्ट प्रशासनाने येत्या वर्षी अधिक पारदर्शक व डिजिटल पद्धतीने देणगी संकलन वाढविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.




