Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर नगराध्यक्षपद सर्वसाधारण पुरुषांसाठी खुलं; चुरशीचा सामना रंगणार !

तुळजापूर नगराध्यक्षपद सर्वसाधारण पुरुषांसाठी खुलं; चुरशीचा सामना रंगणार !

0 7 6 4 8 6

तुळजापूर नगराध्यक्षपद सर्वसाधारण पुरुषांसाठी खुलं; चुरशीचा सामना रंगणार !

नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी स्पर्धेची चिन्हं -गंगणे, कुतवळ, मगर, सूर्यवंशी यांच्यात रंगणार प्रतिष्ठेची लढत!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

राज्य शासनाकडून नुकतीच जाहीर झालेल्या नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत तुळजापूर नगराध्यक्षपद ‘सर्वसाधारण पुरुष’ प्रवर्गासाठी खुलं झाल्याने शहराच्या राजकीय वातावरणात प्रचंड खळबळ उडाली आहे. यामुळे तुळजापूरात प्रस्थापित, अनुभवी व तरुण नेतृत्वामध्ये तीव्र चुरस निर्माण झाली असून पंचरंगी सामना होण्याची चिन्हं स्पष्ट झाली आहेत.

◾दहा ते पंधरा वर्षांचं पालिकेवर अधिराज्य-‘गंगणे’ पुन्हा मैदानात?

गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून अधिक काळ नगरपरिषदेत आपलं अधिराज्य प्रस्थापित ठेवणारे विनोद उर्फ पिंटू गंगणे हे या वेळेसही सर्वाधिक चर्चेत आहेत.नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
जनतेत ‘ विनोद पिंटू गंगणे म्हणजे जनतेचा माणूस’ अशी प्रतिमा असून, वैयक्तिक जीवनात कितीही व्यस्त असले तरी नागरिकांसाठी सदैव तत्पर अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे सोशल मीडियापासून गल्लीबोळापर्यंत “गंगणेच हवे” अशी जोरदार चर्चा रंगत आहे.

◾काँग्रेसचा अभ्यासू चेहरा- अमर मगर चर्चेत

शांत, संयमी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ माजी तालुकाध्यक्ष आणि माजी नगरसेवक मा.अमर मगर हे शहर व तालुक्यात नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मुरब्बी नेते आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून स्थानिक राजकारणात सक्रिय असलेल्या मगर यांना पक्षांतर्गत मोठा सन्मान आहे.त्यांचे लहान भाऊ ऋषिकेश मगर यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला असून खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, जर ओमराजे निंबाळकर यांनी मनावर घेतले, तर मगर बंधूंपैकी एकजण शिवसेनेकडूनही दावेदार ठरू शकतो.

◾महाविकास आघाडीचा अभ्यासू चेहरा -अमोल कुतवळ सज्ज

विधानसभा निवडणुकीपासूनच राजकीय पातळीवर सक्रिय झालेले अमोल कोतवळ हे महाविकास आघाडीचे अभ्यासू व प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. तसेच काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीच्या समन्वयातून कोतवळ यांचे नाव महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत सर्वाधिक चर्चेत आहे.
संघटनात्मक बांधणी, तरुण कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि जनतेशी असलेला थेट संपर्क ही त्यांची बलस्थाने मानली जात आहेत.

◾राष्ट्रवादी काँग्रेसही सज्ज – श्रीकृष्ण सूर्यवंशींचं नाव चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी हे देखील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा रंगत आहे.
सूर्यवंशी यांनी पक्ष संघटना आणि विकासकामांमध्ये गेल्या काही वर्षांत केलेल्या सक्रियतेमुळे राष्ट्रवादीकडूनही तुळजापूरात मजबूत दावेदारी निर्माण झाली आहे.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना रंगण्याची शक्यता यामुळे आणखीनच दृढ झाली आहे.

◾पंचरंगी राजकीय रंगमंच

सर्वसाधारण पुरुष या आरक्षणातून सुटलेल्या नगराध्यक्षपदामुळे शहरात राजकीय पक्षांची हालचाल वेगवान झाली आहे.
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे शिवसेना, शिंदे शिवसेना, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि मनसे या सर्वच पक्षांनी आपापल्या संभाव्य उमेदवारांच्या चर्चेला सुरुवात केली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला असून, आगामी निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये थेट सामना होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

◾नगरपरिषदेच्या विकास आराखड्यामुळे निवडणूक ‘अर्थपूर्ण’

राज्य शासनाकडून तुळजापूर नगरपरिषदेच्या विकासासाठी तब्बल १८६५ कोटी रुपयांचा विकास आराखड्यासाठी मंजूर झाला आहे.या कामांच्या अंमलबजावणीसाठी नवीन नगराध्यक्षांना महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार असल्यामुळे आगामी निवडणूक ‘अर्थपूर्ण’ ठरणार आहे.
विकासाचे सूत्र हातात घेण्यासाठी आणि शहराच्या रूपरेषेत बदल घडवण्यासाठी सर्वच गटांचे नेते सज्ज झाले आहेत.

◾राजकारणात उष्णता वाढली, तुळजापूरात चर्चा रंगली

नगराध्यक्ष पदाचं आरक्षण सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी खुलं होताच, शहरातील राजकारणात तापमान वाढलं आहे.गेल्या दहा वर्षांत सत्ता उपभोगणाऱ्यांच्या विरोधात नव्या चेहऱ्यांनी मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.राजकीय जाणकारांच्या मते, “या वेळेसचा सामना प्रतिष्ठेचा असून, महोत्सवाच्या नगरीत या निवडणुकीत ‘लक्ष्मी दर्शन’ सोबतच ‘राजकीय दर्शन’ देखील रंगणार आहे.”

 

5/5 - (2 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे