ब्रेकिंगमहाराष्ट्र
रोटरी क्लब तुळजापूर व विठाई हॉस्पिटल यांचा संयुक्त उपक्रम; ३ गटांत स्पर्धा, विजेत्यांना रोख पारितोषिके
एक धाव भक्ती"सेवा आरोग्यासाठी"तुळजाई मॅरेथॉन १५ मार्चला

0
6
7
8
4
1
एक धाव भक्ती”सेवा आरोग्यासाठी”तुळजाई मॅरेथॉन १५ मार्चला
रोटरी क्लब तुळजापूर व विठाई हॉस्पिटल यांचा संयुक्त उपक्रम; ३ गटांत स्पर्धा, विजेत्यांना रोख पारितोषिके
तुळजापूर : रोटरी क्लब तुळजापूर व विठाई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तुळजाई मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. १५ मार्च रोजी करण्यात आले आहे. “एक धाव भक्ती, सेवा आरोग्यासाठी” या संकल्पनेतून प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे ३०० स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे. इच्छुकांनी दि.३ मार्च पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पत्रकार परिषदेत अध्यक्ष संतोष लोखंडे यांनी माहिती देताना सांगितले की, स्पर्धा तीन गटांत होणार आहे. पहिल्या गटात १० कि.मी. अंतर असून १८, २५, ३५, ४५ व ५५ वर्षांवरील स्पर्धकांचा समावेश आहे. दुसऱ्या गटात ५ कि.मी. अंतर असून १२, १८, २५, ३५, ४५ व ५५ वर्षांवरील गटांचा समावेश आहे. तिसरा गट सर्वांसाठी खुला असून ३ कि.मी. रनवे असेल. प्रत्येक गटातून पाच विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
प्रांतपाल प्रशांत अपराध यांनी सांगितले की, सर्व सहभागी स्पर्धकांना मेडल, टी-शर्ट व गुडी बॅग देण्यात येणार आहे. विजेत्यांना अनुक्रमे ₹५,०००, ₹३,०००, ₹२,०००, ₹१,००१ व ₹५०० अशी रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.डॉ. श्रीराम नरवडे यांनी सांगितले की, आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने ही स्पर्धा उपयुक्त ठरणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. स्पर्धेचा प्रारंभ व समारोप तालुका क्रीडा संकुल येथे होणार असून रविवारी सकाळी ५.३० वाजता स्पर्धेला सुरुवात होईल.यावेळी सचिव राहुल तागड, रोटरीयन भरत जाधव, संजय मैंदर्गी, अनिल रोचकरी, अमर हंगरगेकर, संजय जाधव, अनंत कोंडो, नगसेवक अमोल कुतवळ, आनंद जगताप आदी उपस्थित होते.

0
6
7
8
4
1



